श्री वारकरी प्रबोधन महासमिती (महाराष्ट्र) तर्फे श्री पांडुरंग पालखी सोहळा श्री राम मंदिर, कॉटनग्रीन ते श्री विठ्ठल मंदिर, वडाळा मुंबई (वर्ष २४वे) आयोजित करत असतात. आपण संत संताजी जगनाडे महाराज चौक, लालबाग मुंबई येथे पालखीचे समाज बंधु भगिनींतर्फे भव्य स्वागत करत असतो.
श्री संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे श्रीक्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे. मुख्य कार्यालय : ८२, भवानी पेठ, पुणे ४११०४२ श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी उत्सव सोहळा मंगळवार, दि. ९ जानेवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता श्रीक्षेत्र सुदूंबरे ता. मावळ
- अनुज हुलके, विदर्भ तेली समाज महासंघ स्थापन होण्यापूर्वी तेली समाजाला हीन लेखणाऱ्या काही घटना घडल्या. त्याच्या निषेधाचे तीव्र पडसाद समाजात उमटले. त्यानंतर तेली समाज आणि इतरही काही शेतकरी-कष्टकरी असलेल्या शुद्र जाती आणि स्त्रियांबद्दल हीन लेखन केलेल्या साहित्याची चर्चा होऊ लागली. यात प्रामुख्याने मनुस्मृतीचा उल्लेख होऊ लागला. आणि हिन लेखल्या गेलेल्या समाजात एकप्रकारे अस्मिता जागृत होऊ लागली.
नविन नाशिक तेली समाज संचलित, श्री संत जगनाडे महाराज सेवा मंडळ, श्री संताजी युवक मंडळ तेली समाज सर्वांगिनी महिला मंडळ नविन नाशिक ४२२००९ च्यावतीने श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त "विद्यार्थी गुणगौरव समारंभ व भव्य पालखी सोहळा शनिवार, दि. १३/१/२०२४ रोजी दुपारी ३ वाजता ठिकाण : भोळे मंगल कार्यालय सिडको-अंबड लिंक रोड, उत्तमनगर, नविन नाशिक येथे
बेलापूर - बेलापूर येथील श्री संतजी जगनाडे महाराज मंदिरामध्ये नुकतीच तिळवण तेली समाजाची बैठक संपन्न झाली. सदरची बैठक ज्येष्ठ मार्गदर्शक अशोकराव भिकचंद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.