Sant Santaji Maharaj Jagnade
श्री संताजी समाज विकास संस्थेचे आयोजन
२५ नोव्हेंबरपर्यंत करता येणार उपवर-वधुंच्या नावाची नोंदणी
अमरावती : श्री संताजी समाज विकास संस्था, अमरावती व्दारा दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुध्दा विदर्भस्तरीय उपवर-वधू परिचय मेळाव्याचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे. विदर्भस्तरीय सर्व शाखीय तेली समाजाचा भव्य उपवर-वधू परिचय मेळावा रविवार १५ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, अमरावती येथे होणार असून
श्री संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्था, जळगाव तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर व पालक परिचय भव्य मेळावा, रविवार,१७ नोव्हेंबर २०१९ मेळाव्याचे ठिकाण : बापुसाो. रामचंद्रशेठ नामदेव चौधरी (उत्राणकर) नगर (सौ. पुष्पावती खुशाल गुळवे हायस्कुल (मॉडर्न गर्ल), स्टेट बँकेजवळ, जळगाव) परिचय पुस्तिकेसाठी वधु-वरांची महिती फॉर्म पाठविण्याचा पत्ता : श्री संताजी कार्यालय, प्लॉट नं.१६, भारत भरीत सेंटर समोर, नेरी नाका, जळगांव.
परळी वैजनाथ तेली समाज श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबरला सर्व शासकीय,निम शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने नुकतेच परित्रक काढले आहे. त्यामुळे शहर व तालुक्यातील सर्व कार्यालयात जयंती साजरी करण्याचे आवाहन तेली युवक संघटना व शनैश्वर प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.
अहमदनगर शहर व जिल्हा तेली समाज संताजी विचार मंच अहमदनगर, भव्य मोफत वधु - वर पालक परिचय मेळावा, अहमदनगर - 2019, रविवार दि. 1 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 ते सायं 6 वाजेपर्यंत सर्व समाज बंधू-भगिनींनो... महाराष्ट्राचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहमदनगर शहरामध्ये भव्य मोफत तृतीय राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा होत आहे. या निमीत्ताने आपले स्वागत करण्यास अ.नगर शहर व जिल्हा तेली समाज, संताजी विचार मंच अहमदनगर उत्सुक आहे. तरी आपल्या मुला-मुलींची नाव नोंदणी करावी हि नम्र विनंती.
जाऊ संताजींच्या गावा .. !
श्रावण मास श्री संताजी महाराज जगनाडे समाधी मंदिर सुदुंबरे येथे ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन व किर्तन सोहळा. पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, दु.१२ ते १ गाथा भजन सायं.४.३० ते ५.३० हरिपाठ, ५.३० ते ७ संगीत भजन व रात्री ७ ते ९ हरिकिर्तन व नंतर हरिजागर होईल. प्रारंभ मिती श्रावण वद्य.10. रविवार दि. 25/8/2019 तर सांगता मिती श्रावण वद्य.१३.बुधवार दि.२८/८/२०१९ रोजी होईल