धुळे - येथील खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने मातृदिनाच्या निमित्ताने रविवार, ८ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या अभूतपूर्व अशा मातृ-वंदन सोहळ्यासाठी वेगवेगळ्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राहून जलतीर्थ संकलित करण्यात येत आहे.
बदनापूर - विद्यार्थ्यांना विनासायास सर्वधर्मिय जात प्रमाणपत्र काढून त्याला लॅमिनेशन करुन वाटप करण्याचा स्त्युत्य उपक्रम महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषद व प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. या उपक्रमाला शुभेच्छा देत मिळालेली प्रमाणपत्रे डिजिटल स्वाक्षरीने मिळालेली असून ते सांभाळन त्याचा उपयोग करण्याचे आवाहन पोलिस उपविभागीय अधिकारी निरज राजगुरू यांनी केले.
धुळे - खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडीच्या वतीने लवकरच तेली समाजातील महिलांसाठी महत्त्वपूर्ण विषयावर महिला मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात आज महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.मालती सुनील चौधरी, सचिव सौ. सविता प्रताप चौधरी, कार्याध्यक्ष सौ. शुभांगी मुकेश चौधरी, कु. चारू सुनील चौधरी यांनी साक्री विधानसभा मतदार संघाच्या कर्तव्यदक्ष महिला आमदार सौ. मंजुळाताई गावित
मराठा तेली समाज विकास मंडळ अमरावती यांच्या सयुक्त विद्यामाने आयोजित (मराठा, तिळवन, लिंगायत) तेली समाज उप वधु-वर परीचय मेळावा आयोजित करण्याचे ठरविले होते, परंतु कोरोनाचे वाढते प्रमाण व नव्यानेच शासनाने जाहीर केलेली नियमावली लक्षात घेता हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात मेळावा न घेता, मोजक्याच समाज बांधवाच्या उपस्तिथीत बंध नात्याचे वार्षिक २०२२
घोटी - संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावात घोटीत साजरा करण्यात आला. अभंगांच्या गजरात, संताजींचा जयजयकार करत समाज बांधवांनी सोहळ्यात सहभाग घेतला. प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. केशव महाराज उखळीकर यांच्या श्रुश्राव्य कीर्तनातही भाविक वर्ग मंत्रमुग्ध झाला होता.