नेर - ता. धुळे - संताजी महाराजांचे विचार सर्व समाजांतील घराघरांत पोचविण्याची गरज असून, त्यांच्या विचारांचे अनुकरण करा हेच खरे अभिवादन असेल, असे मत खानदेश तेली समाज मंडळाचे सचिव रवींद्र चौधरी यांनी व्यक्त केले.
तिरोडा - एरंडेल तेली समाज मंडळाच्यावतीने ८ डिसेंबर रोजी संत जगनाडे महाराज यांची ३९७ वी जयंती महिला मंडळ संयुक्त अशोक वार्ड, खामतलाव रोड, तिरोडा येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी समाजातील विविध मान्यवरांचा सत्कार सुद्धा करण्यात आला.
धुळे : कोरोना संसर्गाच्या काळात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी सामाजिक दायित्व स्वीकारून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक युवक महासंघातर्फे संत जगनाडे महाराजांच्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात आले.
अकोला - संताजी नगर स्थित संत संताजी महाराज मंदिरात जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रकाश डवले अध्यक्ष राज्य तेली समाज समन्वय समिती हे होते. राज्य सरचिटणीस प्रशांत शेवतकर, शेखर देठे राज्य समन्वयक, गोपाल थोटांगे, वैशाली निवाणे, श्वेता तायडे, शितल गोतमारे, दिनेश साठवणे, मेघा साठवणे उपस्थित होते.
चांदवड :- श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा जयंती सोहळा येथे साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ समाजबांधव सोनुपंत ठाकरे व राऊत बाबा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संताजी महिला मंडळाची नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली.