Sant Santaji Maharaj Jagnade
पिंपळनेर : येथील तेली समाजाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी पांडुरंग सूर्यवंशी, तर उपाध्यक्षपदी सुभाष नेरकर यांची निवड करण्यात आली. तैलीक समाज कार्यालयात नूतन कार्यकारणीच्या निवडीसाठी बैठक झाली. उर्वरित कार्यकारिणी अशीकार्यअध्यक्ष देविदास कृष्णा नेरकर,सचिव भरत बागुल, खजिनदार देविदास महाले यांची निवड करण्यात आली
जळगाव जामोद संग्रामपुर तालुका तेली समाजाच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय वधू वर परीचय मेळावा समाज बांधवांच्या उपस्थितीत कोरोना नियमाचे पालन करून संपन्न झाला. कोरोणाच्या या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपापल्या वधू व वरांचे लग्न जुळवण्यासाठी गावोगाव न फिरता जळगाव जामोद संग्रामपूर तेली समाजाच्या सहकार्याने वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन १९ डिसेंबर २०२१ रोजी जळगाव जामोद येथे सकाळी दहा ते पाच या कालावधीत करण्यात आले होते.
श्री संताजी समाज विकास संस्था, अमरावती अध्यक्ष - प्रा.संजय आसोले (राष्ट्रपती पदक सन्मानीत) (र.सं. महा./१८७ -कार्यालय :- प्लॉट नं. ८, कलोती नगर, श्री नंदराज यादव यांचे घरासमोर, जुना बायपास रोड, दस्तुर नगर परिसर, अमरावती. संपर्क क्र. : ९९७०३८१८२४ तेली समाजाचा सर्व शारवीय राज्यस्तरीय भव्य उपवर-वधू परिचय मेळावा - २०२२ व "विवाह बंधन” परिचय पुस्तिकेचे विमोचन
अकोला - राज्य तेली समाज समन्वय समितीच्यावतीने जळगाव जामोद संग्रामपूर तालुका तेली समाजाच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्यास समाज बांधवांनी कोरोना नियमाचे पालन करून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नंदुरबार येथील कन्या असलेल्या प्रसिध्द उद्योजिका तथा झेप फाऊंडेशन व भारताच्या ग्लोबल वेलनेसच्या राजदूत डॉ.रेखा चौधरी यांनी लिहिलेल्या इंडिया एन्शेंट लेगसी ऑफ वेलनेस या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच डॉ.रेखा चौधरी यांच्या लिखीत पुस्तिकेची पंतप्रधानांच्या ट्रिटर टीमने दखल घेतली आहे.