खान्देश तेली समाज मंडळ धुळे शहर आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवार, दि. ३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९.३० वाजता आय. एम. ए. हॉल, क्युमाइन क्लब च्या समोर, जेल रोड, धुळे या ठिकाणी आयोजित केलेला असून त्यासाठी संपूर्ण जिल्हाभरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
शिवसेना धुळे महानगर प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल श्री सतिष तात्या महाले यांचां, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवाआघाडी धुळे वतीने सत्कार करण्यात आला. प्रदेश महासचिव नरेंद्रजी चौधरी.जिल्हाअध्यक्ष कैलास काळू चौधरी.तालुका अध्यक्ष श्री विलास आण्णा चौधरी विभागीय उपाध्यक्ष तुषार दादा चौधरी.वि.पदधिकारी श्री शशिकांत चौधरी श्री अनिल आहीरराव से आ अध्यक्ष श्री सुभाष बापू जाधव श्री रमेश जी करणकाळ.
ओझर तालुका जामनेर येथे मागील पंधरवड्यात वादळी पाऊस झाला त्या पावसामध्ये आपल्या तेली समाजातील अनेक कुटुंबांचे नुकसान झाले. घरांची पडझड झाली शेतकऱ्यांचे पीकांचे व गुरेढोरे जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तेथील नुकसानग्रस्त शेतकर्यांची चर्चा करून त्यांना शासन स्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी खानदेश तेली समाज मंडळ प्रयत्न करीत आहे.
तेली समाजाचे उत्तर महाराष्ट्रातील मार्गदर्शक व आधारस्तंभ तैलिक महासभेचे नाशिक विभागाचे अध्यक्ष स्व. आर. टी. अण्णा चौधरी यांना आज खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मंडळाच्या कार्यालयात समाज सारथी भाऊसाहेब दौलत नामदेव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेत सर्वप्रथम श्री अनिल नाना अहिरराव यांनी आर.टी. अण्णांच्या प्रतिमेचे पूजन केले.
जळगाव - नाशिक विभागीय तैलिक महासभा अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आर. टी. अण्णा चौधरी (वय ८३) यांचे शनिवार दि. १ मे रोजी पहाटे ४ वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र तेली समाजात पोकळी निर्माण झाली.