Sant Santaji Maharaj Jagnade
अकोला - संताजी नगर स्थित संत संताजी महाराज मंदिरात जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रकाश डवले अध्यक्ष राज्य तेली समाज समन्वय समिती हे होते. राज्य सरचिटणीस प्रशांत शेवतकर, शेखर देठे राज्य समन्वयक, गोपाल थोटांगे, वैशाली निवाणे, श्वेता तायडे, शितल गोतमारे, दिनेश साठवणे, मेघा साठवणे उपस्थित होते.
चांदवड :- श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा जयंती सोहळा येथे साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ समाजबांधव सोनुपंत ठाकरे व राऊत बाबा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संताजी महिला मंडळाची नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली.
मालेगाव :- थोर संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती शहर व तालुक्यात उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. मालेगाव कॅंप येथे संताजी उत्सव समितीतर्फे प्रतिमा पुजन करण्यात आले.याप्रसंगी १९७१च्या युद्धात भाग घेतलेले धोंडु चित्ते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. १८० जणांनी यात सहभाग नोंदवला.संताजी मंगल कार्यालय मालेगाव येथेही जयंती कार्यक्रम संपन्न झाला.
साखळी ग्रामपंचायत कार्यालयात ८ रोजी श्री संत शिरोमणी संताजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमात जळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षण, क्रिडा व आरोग्य सभापती रविंद्र सूर्यभान पाटील यांच्या हस्ते श्री संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रा.पं. सदस्य सय्यद अशपाक सय्यद शौकत, श्रीमती रुखमाबाई निळे,
रावेर शहर साकळी येथे श्री संताजी तेली समाज पंच मंडळाच्या वतीने दि. ८ रोजी श्रीसंत शिरोमणी संताजी महाराज जयंती उत्सवाच्या निमित्ताने प्रतिमेचे पूजन तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व विविध मान्यवरांच्या सत्कार सोहळा अश्या संयुक्तिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजातील ज्येष्ठ नागरिक दगडू कपले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य श्रीमती रुक्माबाई निळे,