ओबिसीच्या व्यासपिठावर बाजू मांडण्यासाठी ओबिसी विषयांवर अभ्यास असलेले आपले महासचिव डॉ. भूषण कर्डिले यांचे भाषण प्रत्येक ठिकाणी होणे आवश्यक - खा. रामदासजी तडस नाशिक - राज्यस्तरीय पदाधिकारी, सर्व आघाडी विभागाध्यक्ष /विभाग सचिव, जिल्हाध्यक्ष व सचिव यांची रविवार दि . २१ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळ ६:०० वा.माननिय प्रदेशाध्यक्ष व खासदार श्री. रामदासजी तडससाहेब यांचे अध्यक्षतेखाली झूमसभा मोठ्या जोषपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने रविवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी धुळे महानगरी मध्ये समाजभूषण स्व. दत्तात्रय लालचंद महाले नगर, हिरे भवन, कोर्टासमोर, स्टेशन रोड, धुळे याठिकाणी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तेली समाज संस्थेतर्फे परिचय सूचीचे प्रकाशन सूची पथदर्शी ठरणार, मान्यवरांचे गौरवोद्गार
जळगाव - श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळातर्फे राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय पुस्तिका सूचीचे प्रकाशन रविवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हॉटेल रिगल पॅलेस येथे कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी संताजी जगनाडे महाराज व कडुजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
दि.14/11/2021 रोज रविवारला स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ, जळगाव जामोद येथे तेली समाज वधू - वर व पालक परिचय मेळावा समितीची कार्यकर्ता बैठक गणेशभाऊ गोतमारे (सोनाळा) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
शिरपूर - राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने नविन मतदार नोंदणी ऑनलाइन पद्धतीने सुरू असून त्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत त्यामूळे सामान्य व गरीब व्यक्तींची गैरसोय टाळण्यासाठी ती ऑफलाईन पद्धतीने करण्याची मागणी प्रदेश तेली महासंघ युवक आघाडीचे राज्याचे प्रदेश कार्याध्यक्ष शामकांत ईशी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.