धुळे- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष खासदार रामदासजी तडस, महासचिव डॉ. भूषणजी कर्डिले, कोषाध्यक्ष गजाननजी शेलार, कार्याध्यक्ष अशोक काका व्यवहारे, विभागीय अध्यक्ष आर.टी.अण्णा चौधरी, सुनिल चौधरी, कल्याण, प्रसिध्दी प्रमुख दिलीप चौधरी, यांच्या सुचनेवरुन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक युवा महासभेचे राज्य अध्यक्ष आमदार संदीप भैय्या क्षिरसागर,
तेली समाजामध्ये खान्देशात सामाजिक सेवा देणारे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा लवकरच " समाज सारथी " पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. लवकरच या शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात येईल. समाजाच्या तळागाळापर्यंत सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा यामध्ये " समाज सारथी " पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल
अमरावती : जयभारत मंगल कार्यालय येथे मराठा-तेली समाज विकास मंडळाद्वारे आयोजित शिक्षकांचे स्नेहसंमेलन नुकताच पार पडले. मराठा-तेली समाजात अनेक शिक्षक असले, तरी त्यांना एकमेकांचा प्रत्यक्ष परीचय नाही. त्यामुळे शिक्षकांचेपण संघटन निर्माण व्हावे, यासाठी प्रत्येकाने एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ. संजय तिरथकर यांनी केले.
नंदुरबार, ता. १७ : अखिल भारतीय तेली समाजाची बैठक भाजपचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष तथा तेली युवक आघाडीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष विजय चौधरी यांच्या निवासस्थानी झाली. तेली महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर अध्यक्षस्थानी होते.
खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.वकृत्व स्पर्धा दोन गटात असून स्पर्धेसाठी " संताजी महाराजांचा इतिहास " हा विषय असून स्पर्धकाने २ मिनिटांचा व्हिडिओ चित्रीकरण करून पाठवायचा आहे. स्पर्धा फक्त तेली समाजासाठी मर्यादित असून स्पर्धेसाठी तयार व्हिडिओ दिनांक ९ जानेवारी २०२१ पर्यंत पाठवायचे आहेत.