मुक्ताईनगर : पहिल्या आमदार निधीतुन तेली समाज मंगल कार्यालयाच्या निर्मितीसाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार तसेच इतर मित्र आमदार यांच्याकडूनही भरीव निधी आणण्यास पुढाकार घेईल, असे आश्वासन आ.चंद्रकांत पाटील यांनी दिले. ते मुक्ताईनगर येथील तेली समाजातर्फे संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात सत्कार मूर्ती म्हणून सत्कार स्वीकारतांना बोलत होते.
परभणी येथील नांदखेडा रोडवरील पलसिध्द सेवाआश्रम येथे रविवारी ता. ८ रोजी महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभेच्या सर्व जि.शा.परभणी व महासभेच्या सर्व शाखीय च्या वतीने संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली.संत श्री संताजी जगनाडे महाराजांवर संत श्रेष्ठ जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा प्रचंड प्रभाव होता.ते संत तुकाराम महाराजांच्या १४ प्रमुख टाळकर्यांन पैकी एक होते.
अकोला, ता. ८ : तुकोबाजी गाथा ज्यांनी घराघरात पोहोचवली असे तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्त रविवारी (ता.८) शहरतील पंच बंगला येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. संताजी सेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या मिरवणुकीत समस्त समाज बांधव सहभागी झाले होते.
तेली युवा संघ जालना कन्हैयानगर आयोजित तेली समाजाचे आराध्य दैवत श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज 396 वी जयंती महोत्सव दि. 8/12/2019 रोजी आयोजीत करण्यात आलेला आहे. श्री संत शिरामेणी संताजी जगनाडे महाराज यांच्या 396 वी जयंती निमित्त दि. 08/12/2019 रोजी भव्य मिरवणुक आयोजित केली जाणार आहे. सदर कार्यकमाची वेळ सायं. 5 वाजता, स्थळ विठ्ठल रूख्मिणी मंदीर, कन्हैयानगर, जालना ही राहील
तेली समाजाच्या मागण्यासाठी नागपूर येथे शुक्रवार दि. 19 डिसेंबर 2019 ला सकाळी 9.30 वा. एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक लहान गावातुन 50 व मोठ्या गावातून 100 जण आलेत तर विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वासिम या जिल्ह्यासह यासह