तेली युवा संघ जालना कन्हैयानगर आयोजित तेली समाजाचे आराध्य दैवत श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज 396 वी जयंती महोत्सव दि. 8/12/2019 रोजी आयोजीत करण्यात आलेला आहे. श्री संत शिरामेणी संताजी जगनाडे महाराज यांच्या 396 वी जयंती निमित्त दि. 08/12/2019 रोजी भव्य मिरवणुक आयोजित केली जाणार आहे. सदर कार्यकमाची वेळ सायं. 5 वाजता, स्थळ विठ्ठल रूख्मिणी मंदीर, कन्हैयानगर, जालना ही राहील
तेली समाजाच्या मागण्यासाठी नागपूर येथे शुक्रवार दि. 19 डिसेंबर 2019 ला सकाळी 9.30 वा. एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक लहान गावातुन 50 व मोठ्या गावातून 100 जण आलेत तर विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वासिम या जिल्ह्यासह यासह
रावेर - शासकीय कार्यालयांत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्याचे शासकीय आदेश आहेत. यासंदर्भात नगरसेवक अॅड. सूरज चौधरी यांनी आज जळगाव येथे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन शासनाचे पत्र दिले.
दि.०२/१२/१९ दिनांक रोजी साक्री तिळवण तेली समाजाचे सर्व बांधव एकत्र येऊन साक्री शहरातले शासकीय कार्यालय येथे संत जगनाडे महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली साक्री शहरातील तहसील कार्यालय ,पोलीस स्टेशन , नगर पंचायत , पंचायत समिती, व साक्री बस डेपो व इतर सर्व कार्यालय येथे प्रतिमा भेट देण्यात आली याप्रसंगी सर्व समाज बांधव उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नाशिक विभागीय तेली समाज युवक आघाडीचे विभागीय अध्यक्ष शामकांत जगन्नाथ ईशी यांची निवड अ.भा.तेली साहू सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षिरसागर यांचे आदेशानुसार युवक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सुखदेव वंजारी यांनी केली आहे.