Sant Santaji Maharaj Jagnade
धुळे शासकीय आदेशानुसार तेली समाजाचे आराध्य दैवत थोर संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त ८ डिसेंबरला प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयात प्रतिमापूजन करण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर खानदेश तेली समाज मंडळातर्फे श्री संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांना भेट दिली. शासकीय व निमशासकीय कार्यालयांत श्री. संताजी जगनाडे महाराजांची प्रतिमा असणे आवश्यक आहे.
तेली समाज मेळाव्यात पाच विवाह जुळले १९०५ युवक-युवतींनी दिला परिचय : सुचीचे प्रकाशनजळगाव संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित तेली समाज वधुवर मेळाव्यात १९०५ युवक-युवतींनी परिच्य करून दिला.दरम्यान,मेळाव्यात पाच विवाह जुळले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वधुवर सुचीचे प्रकाशन करण्यात आले. पुष्पमती गुळवे हायस्कूल व्या प्रांगणात आयोजित मेळाव्याचे उद्घाटन आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरणाव चे माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी हे होते.
दिनांक :15/9/2019 रोजी शिरपूर येथे धुळे जिल्हा तैलिक समाज युवक आघाडी तर्फे आयोजित जिल्हास्तरीय गुणगौरव समारंभ मुकेशभाई टाऊन हॉल येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री विजय भाऊ चौधरी यांचा सत्कार करताना माजी मंत्री तथा आमदार माननीय श्री अमरिशभाई पटेल व्यासपीठावर उपस्थित
श्री संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्था, जळगाव तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर व पालक परिचय भव्य मेळावा, रविवार,१७ नोव्हेंबर २०१९ मेळाव्याचे ठिकाण : बापुसाो. रामचंद्रशेठ नामदेव चौधरी (उत्राणकर) नगर (सौ. पुष्पावती खुशाल गुळवे हायस्कुल (मॉडर्न गर्ल), स्टेट बँकेजवळ, जळगाव) परिचय पुस्तिकेसाठी वधु-वरांची महिती फॉर्म पाठविण्याचा पत्ता : श्री संताजी कार्यालय, प्लॉट नं.१६, भारत भरीत सेंटर समोर, नेरी नाका, जळगांव.
परळी वैजनाथ तेली समाज श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबरला सर्व शासकीय,निम शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने नुकतेच परित्रक काढले आहे. त्यामुळे शहर व तालुक्यातील सर्व कार्यालयात जयंती साजरी करण्याचे आवाहन तेली युवक संघटना व शनैश्वर प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.