श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरीनाम सप्ताह. मुर्ती पुजन दि. 2/1/2016 शनिवार रोजी सकाळी 8 वाजता ठिकाण श्री संताजी मंदीर, तेली गल्ली, तेली भुवन चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आलेला आहे. किर्तन सप्ताह दि. 8/1/2016 ते दि. 8/1/2016 (वेळ रात्री 9 ते 11). श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक दि. 8/1/2016 रोजी दुपारी 4 वाजेपासुन ठिकाण चौधरी केबल नेटवर्क घाट रोड, तेली गल्ली पसुन होईल. महाप्रसाद शुक्रवार दि. 8/1/2016 रोजी सकाळी 11 ते 3 ठिकाण श्री संताजी मंदिर, तेली गल्ली, तेली भुवन जवळ चाळीसगांव.
औरंगाबाद - तिळवण तेली समाज जनगणना अभियानास शहर तसेच जिल्ह्यात समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अभियान राबवणारे कार्यकर्ते माहिती संकलन करण्यासाठी घरोघरी भेटी देत आहेत. जनगणनेचे अभियान अंतिम टण्यात सुरू आहे. तसेच समाजाच्या माहितीपुस्तिका तयार करण्याचे कामदेखील सुरू आहे. याबाबत माहिती संकलन करण्याची अंतिम मुदत १० डिसेंबरपर्यंत आहे.
उस्मानाबाद दि. 23-03-2018 उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची २४ रोजी शासकीय विश्रामगृह येथे दुपारी २ वाजता जिल्ह्यातील सर्व तेली समाज बांधवाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ घोडके जिल्हा सचिव अॅड. विशाल साखरे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
नाशिक तेली समाज रत्नांचा भव्य सत्कार सोहळा व विद्यार्थी गुण गौरव समारंभा, तैलिक महासभा मिटींग
रविवार दि. 5/8/2018 रोजी दु. 2.00 वाजता. सत्कार मुर्ती - श्री. भुषणजी कर्डीले, महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती, जमाती आयोग सदस्य, श्री. गजानन दामोदर शेलार, महाराष्ट्र राज्य तैलिक महासभा कार्याध्यक्ष, गटनेते तथा नगरसेवक मनपा नाशिक, श्री. अशोककाका व्यवहारे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तैलिक महासभाा, श्री. मनोज घोंगे, नगराध्यक्ष, नगरपंचायत सुरगाणा, मा. श्री. संतोष सदाशिव कदम, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान,
बीड :- जय संताजी प्रतिष्ठान, जिल्हा बीडच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार तेली समाज भुषण व अखिल भारतीय तैलिक साहु महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आ. जयदत्तजी (आण्णासाहेब) क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.