जालना : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणारया संशयितांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सोमवारी सकल तेली समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेक-यांनी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना दिले. सकाळी अकराच्या सुमारास शासकीय विश्रामगृहासमोरून या मोर्चास सुरुवात झाली.
शिंदखेडा - तालुक्यातील दोंडाईचा शहरात बालवाडीत शिकणाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारया नराधमास आणि त्यास पाठीशी घालणा-यांना त्वरित अटक करुन कठोर कार्यवाही करावी, या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
दोंडाईचा येथे एका 5 वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर नराधमांनि लैंगिक अत्याचार केला. ह्या घटनेच्या निषेधार्थ व आरोपींना अटक करुन कड़क शासन झाले पाहिजे ह्यासाठी 26 फेब्रूवारी २०१८ वार - सोमवार रोजी जामनेर तेली समाज महा मूक मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.
धूळे जिल्ह्यातील दोंडईचा शहरात नुतन महाविद्यालयात शाळेत तेली समाजाच्या ५ वर्षिय बालीकेवर बलात्कार करण्यात आला.त्याचा निषेध म्हणून व आरोपीवर कठोर कार्यवाही होवून फाशीची शिक्षा व्हावी व आरोपीला साथ देणार्यांना कठोर शासन व्हावे या मागणीसाठी महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा जिल्हा बीड तसेच संताजी यूवा सेना
धूळे जिल्ह्यातील दोंडईयचा शहरात नुतन महाविद्यालयात शाळेत तेली समाजाच्या ५ वर्षिय बालीकेवर बलात्कार करण्यात आला. त्याचा निषेध म्हणून व आरोपीवर कठोर कार्यवाही होवून फाशीची शिक्षा व्हावी. या मागणीसाठी अखिल भारतीय तैलिक साहू महासभा नवी दिल्ली, महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा जिल्हा भंडारा तसेच संताजी यूवा सेना भंडारा तर्फे निवेदन मा.जिल्हाधिकारी भंडारा