Sant Santaji Maharaj Jagnade
औरंगाबाद - जगतगुरू तुकाराम महाराज यांचे गाथा लेखक व तेली समाजाचे दैवत संतश्री जगनाडे महाराज यांची पुण्यथिती समाजबांधवानी घरोघरी साजरी करावी. जेणेकरून एकोपा निर्माण होऊन आपलेपणेची भावना निर्माण होईल. न्यू जयश्री अँडव्हर्टायझिंग एजन्सीचे संचालक राजेंद्र होळीवाले यांच्या ठाकरे नगर N-2 सिडको येथील निवास्थानी अभिवादन सभेचे आयोजन होते.
संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम, मिरवणुकीस प्रतिसाद
संत जगनाडे महाराजाचे कार्य प्रेरणादायी
जालना तेली समाज : जगतगुरु संतश्रेष्ठ श्री. तुकाराम महाराजांची गाथा लिहून - काढणारे श्री संत जगनाडे महाराज यांचे कार्य प्रेरणादायी आहे. म्हणून प्रत्येकाने त्यांच्या कार्याचे अनुकरण करून आपले जीवन सुखकर करावे, असा हितोपदेश हभप, भगवान महाराज आनंदगडकर यांनी दिला आहे.
तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त बुधवार दि. १८ डिसेंबर २०१९, सकाळी १० ते २ पर्यंत, नंदीकेश्वर संस्थान, नंदीपेठ, आकोट या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी समाजातील महिलांचे सशक्तीकरण या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान तसेच तेली समाजातील उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आलेला आहे.
जालना तेली समाज - एक दिवसीय किर्तनमहोत्सव ठेउन श्री संताजी महाराज युवा मित्र मंडळ सामनगाव यांच्या वतिने साजरी करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिति शिव चरित्रकार श्री नितीन महाराज सवडतकर ( आळंदी देवाची ) तेली समाज युवा नेते विकी भैय्या वाघमारे,विलासराव भालेराव, अजय राउत, किरण साखरे, सोपान शिंदे, गणेश भालेराव, केशव मालोदे, रवी भरदम,
मुक्ताईनगर : पहिल्या आमदार निधीतुन तेली समाज मंगल कार्यालयाच्या निर्मितीसाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार तसेच इतर मित्र आमदार यांच्याकडूनही भरीव निधी आणण्यास पुढाकार घेईल, असे आश्वासन आ.चंद्रकांत पाटील यांनी दिले. ते मुक्ताईनगर येथील तेली समाजातर्फे संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात सत्कार मूर्ती म्हणून सत्कार स्वीकारतांना बोलत होते.