नांदेड : दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यात नांदेड तेली समाजातर्फे लावण्यात येणाऱ्या श्री नवनाथ कथेचे आयोजन तेली समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. ही कथा दोन ते ३१ ऑगस्ट दरम्यान चालणार आहे. रोज रात्री आठ वाजता नावघाट रोडवरील भाई गल्लीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कथा वाचन होत आहे. भाविकांनी कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
- जन्मांतरीचे दोष गेले दग्ध होऊन -
शेंदुर्णी, जळगाव जिल्हयातल्या जामनेर तालुक्यातील एक पुराणप्रसिध्द व महाविष्णू भगवान त्रिविक्रम महाराजांच्या भक्तीचे केंद्र, भक्तीमय वातावरणातली टुमदार नगरी. परिसरातील चौर्याऐंशी गावांचे माथा झुकवणीचे श्रध्दास्थान. प्राचीन परंपरांची पुण्यदान नगरी. स्वर्गीय देवांच्या आशीर्वादाने सदाचार्यांचे वसतिस्थान.
भंडारा प्रांतिक तेली युवा आघाडीची जिल्हा बैठक
भंडारा : प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडीची भंडारा जिल्हा आढावा बैठक येथे पार पडली. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे कोषाध्यक्ष कृष्णराव हिंगणकर होते.
नांदेड प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी नांदेड तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सत्कार सोहळ्याचे व रक्तदान शिबिराचे आयोजन नांदेड तेली समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने येथील कुसुम सभागृहात करण्यात आले आहे.
धुळे राज्य शासनाने नुकताच सरकारी-निमसरकारी कार्यालयात श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्याचे आदेश अध्यादेशाद्वारे नुकतेच पारित केले आहेत. तसेच श्री संताजी महाराजांची यंदा ३९५ वी जयंती साजरी होणार आहे हे औचित्य साधुन दि.८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता राजवाडे बँकेजवळील गुरूशिष्य स्मारका जवळ गुरूपुत्र गिरीश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरतीचे आयोजन करण्यात आल्याचे सुभाष धर्मा जाधव यांनी काल घेतलेल्या पत्रपरिषदेत सांगितले.