नंदुरबार, ता. १७ : अखिल भारतीय तेली समाजाची बैठक भाजपचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष तथा तेली युवक आघाडीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष विजय चौधरी यांच्या निवासस्थानी झाली. तेली महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर अध्यक्षस्थानी होते.
खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.वकृत्व स्पर्धा दोन गटात असून स्पर्धेसाठी " संताजी महाराजांचा इतिहास " हा विषय असून स्पर्धकाने २ मिनिटांचा व्हिडिओ चित्रीकरण करून पाठवायचा आहे. स्पर्धा फक्त तेली समाजासाठी मर्यादित असून स्पर्धेसाठी तयार व्हिडिओ दिनांक ९ जानेवारी २०२१ पर्यंत पाठवायचे आहेत.
श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती हिवरखेड येथे साजरी
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज मूळ गाथेचे लेखनकर्ते, जांच्या अथक परिश्रमातून तुकाराम महाराजांच्या गाथा आपल्यासमोर आल्या, तुकोबारायांचे सर्वात आवडते टाळकरी व शिष्य, संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज.
देऊळगाव राजा : श्री संत संताजी महाराज जयंती निमित्त महाराजांच्या मुळगावी संदूबरे जिल्हा पुणे येथे फार मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरा करण्यात येत असतो. अख्ख्या महाराष्ट्रातील समाज बांधव दर्शन चा लाभ घेत असतात. परंतु यावेळी कोरोनासारख्या महामाारीने मानवतेलाच नाही घेरले तर भगवंताचे दारेही बंद केली.
नायगाव, दि. १२ - संत संताजी जगनाडे महाराजांची शासकीय जयंती तालुका कृषी अधिकारी कार्यालयात साजरी केली नसल्याची तक्रार जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडे तेली समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष रामकिशन पालनवार यांनी केली आहे.