धुळे - संताजी जगनाडे महाराज यांची ८ डिसेंबरला जयंती व १ जानेवारीला पुण्यतिथी आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील गुरु-शिष्य स्मारक परिसरातील रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी तेली समाज मंडळाने केली आहे. याविषयी महापौर प्रदीप कर्पे यांना निवेदन देण्यात आले.
धुळे - खान्देश तेली समाज मंडळाचे कार्य कौतुकास्पद असून आजपर्यंत त्यांनी समाजासाठी भरीव योगदान दिले असल्याचे मत काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष युवराज करनकाळ यांनी व्यक्त केले. ते खान्देश तेली समाज मंडळ धुळे शहर आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९७ व्या जयंतीनिमीत्त भव्य सर्व रोग निदान शिबीर सवलतीच्या दरात रक्त तपासणी, सोनोग्राफी, एक्सरे दि. ०८ डिसेंबर २०२१, बुधवार, वेळ : सकाळी १०.०० ते दु. २.०० पर्यंत सकाळी ८ वा. ( मास्क अनिवार्य आहे ) आयोजित करण्यात आलेले आहे.
राठोड तेली युवा सेना महाराष्ट्र अंतर्गत वधु-वर मेळावा समिती आयोजित राज्यस्तरीय राठोड तेली वधु - वर पालक परिचय मेळावा-२०२२, राठोड समाज भुषण पुरस्कार व आदर्श माता सन्मान सोहळा रविवार दि. १६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० ते सायं ५ वाजेपर्यंत मेळाव्याचे ठिकाण : सखुबाई गबाजी गवळी गार्डन हॉल जय महाराष्ट्र चौक समोर, भोसरी, पुणे - ३९.
ओबिसीच्या व्यासपिठावर बाजू मांडण्यासाठी ओबिसी विषयांवर अभ्यास असलेले आपले महासचिव डॉ. भूषण कर्डिले यांचे भाषण प्रत्येक ठिकाणी होणे आवश्यक - खा. रामदासजी तडस नाशिक - राज्यस्तरीय पदाधिकारी, सर्व आघाडी विभागाध्यक्ष /विभाग सचिव, जिल्हाध्यक्ष व सचिव यांची रविवार दि . २१ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळ ६:०० वा.माननिय प्रदेशाध्यक्ष व खासदार श्री. रामदासजी तडससाहेब यांचे अध्यक्षतेखाली झूमसभा मोठ्या जोषपूर्ण वातावरणात संपन्न झाली.