जामनेर - खान्देश तेली समाज मंडळ जामनेर तालुक्याचे अध्यक्ष श्री अजय अशोक चौधरी यांची मुलगी कु.ईशिका हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुधवार दि. २७ रोजी शालेय शिक्षण घेणाऱ्या गरीब मुला-मुलींना शालेय दप्तर वाटप करण्यात येणार आहे. जामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हे दप्तर वाटप करण्यात येतील.
खान्देश तेली समाज मंडळ, धुळे. राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा रविवार, दि. १३ नोव्हेंबर २०२२ फॉर्म जमा करणे व पाठविण्याचा पत्ता : खान्देश तेली समाज मंडळ कार्यालय, द्वारा कैलास आधार चौधरी, ग.नं. ४, घर नं. २९२६, कैलास दुग्धालय, चैनी रोड कॉर्नर, धुळे. मोबा. ९९२२५८९९९९ मेळाव्याचे ठिकाण : स्व. दत्तात्रय लालचंद महाले नगर, नुतन पाडवी विद्यालयाचे मैदान, स्टेशन रोड, धुळे. फॉर्म स्विकारण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टोबर २०२२
धुळे - खान्देशातील तेली समाजामध्ये अग्रगण्य असलेल्या खान्देश तेली समाज मंडळ या संस्थेच्या साक्री तालुका अध्यक्षपदी साक्री येथील युवा कार्यकर्ते युवराज पंढरीनाथ महाले यांची निवड करण्यात आलेली आहे. मंडळाचे धुळे शहर अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी यांचे शिफारशीवरून अध्यक्ष कैलास आधार चौधरी यांच्या आदेशाने सचिव रवींद्र जयराम चौधरी यांनी ही निवड करीत असल्याचे जाहीर केले आहे.
धुळे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष व खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष अशोककाका व्यवहारे, महासचिव डॉ. भूषण कर्डिले व कोषाध्यक्ष गजानननाना शेलार, ठाणे विभाग अध्यक्ष सुनील चौधरी, युवा आघाडी प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी, जेष्ठ नेते बबनराव चौधरी यांच्या मार्गदर्शना खाली
दिव्यत्वाची जेथे प्रचीती तेथे कर माझे जुळती." राहाता तालुका व अहमदनगर जिल्हा संघटन करण्यासाठी तनमनधनाने झोकून देणारे,जेष्ठ मार्गदर्शक थोर प्रतिभाशाली, ज्यांनी समाजापुढे पुढारलेले विचार मांडून समाज सुधारण्याचे कार्य ज्यांनी केले ते कै.प्रभाकरराव रंगनाथ नागले यांना त्यांच्या पुण्यस्मरणार्थ दिनी भावपूर्ण आदरांजली.