शिरपूर, शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये थोर संत, व्यक्ती यांची जयंती साजरी करण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाने सुची तयार केलेली आहे. या सुचीमध्ये प्रथमच संत जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबर रोजी साजरी करण्याला तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिल्याने या वर्षीपासून संत जगनाडे महाराज यांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात येणार
संत संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील चाकण या गावी ८ डिसेंबर १६२४ रोजी झाला. संताजींचे वडील विठोबा यांचा परंपरागत असा धान्यापासून तेल गाळून ते विक्री करण्याचा व्यवसाय होता. संताजींचे कुटुंब वारकरी संप्रदायाचे पाईक होते. घरात वंशपरंपरेने पंढरपूरच्या विठोबाची वारी अखंडित होती. घरातच ग्रंथांचे वाचन, पारायणे चालत. तसेच कीर्तन, प्रवचन यांना उपस्थित राहण्यात खंड नसे. हे सर्व संस्कार संताजींवर झाले. तत्कालीन परंपरेनुसार अगदी बाल वयातच विवाह होत असत. संताजींचा विवाह त्यांच्या वयाच्या ११ व्या वर्षी खेडच्या कहाणे घराण्यातील यमुनाबाई यांच्याशी झाला.
गडचिरोली : स्थानिक पटवारी भवनात नुकत्याच पार पडलेल्या एरंडेल तेली समाजाच्या बैठकीत समाजाची जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी धुडेशिवणीचे भगवानराव ठाकरे, उपाध्यक्ष कवळ समर्थ, चंद्रशेखर मुरतेली, सचिव वेणुदास सहारे, सहसचिव जगदीश्वर ठाकरे, मुख्य संघटक फकिरा भरडकर, कोषाध्यक्ष तुळशिदास करकाडे तर सदस्यपदी सुखदेव कोलते, राजू ठाकरे, युवराज करकाडे, घनश्याम लाकडे, संभाजी ठाकरे, अनिल कोलते, नामदेव कोलते, जीवनदास कोलते, क्रिष्णा भरडकर यांची निवड करण्यात आली.
प्राचीन भारताचा इतिहास जितका समृद्ध आहे, तितकाच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात दक्षिण भारताचा इतिहास समृद्ध आहे. मध्ययुगीन बारावे शतक हे परिवर्तनाचे शतक मानले जाते. आजपासून 900 वर्षांपूर्वीची सामाजिक परिस्थिती खूप बिकट होती. माणूसच माणसाचा गुलाम बनला होता. मराठी कष्ट न करता फुकट खाणारा वर्ग समाजात वाढत होता. कष्ट करणारे अठरा आलुतेदार आणि बारा बलुतेदार कष्ट करत होते.
चांदा जिल्हा संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर गुणवंत गौरव समारंभ २०१९ दिनांक रविवार दि. ४ ऑगस्ट २०१९ ला दुपारी २.०० वाजता श्री संताजी सभागृह, भानापेठ वार्ड, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तेली समाजातील शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात वर्ष २०१८-२०१९ मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यास आपली सर्व तेली समाज बांधवानी उपस्थित राहावे हि विनंती आयोजका कडुन करण़्यात आलेली आहे.