Sant Santaji Maharaj Jagnade
सर्व तेली समाज बांधवांना सूचित करण्यात येते की श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त दिनाक:-०७-१२-२०१९ सकाळी 11 वाजता महाआरोग्य शिबिर ठेवण्यात आले आहे तरी सर्व समाज बांधवांनी शिबिराचा लाभ घ्यावा हीच नम्र विनंती. दिनाक:-०७-१२-२०१९ स्थळ:- तेली समाजाच्या जागेवर हनुमान मंदिर जवळ जुनोणा चौक बाबुपेठ, चंद्रपूर
देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळ, देवगड आयोजित संत जगनाडे महाराज जयंती उत्सव, रविवार, दि. 08/12/2019 रोजी तळेबाजार (अस्मिता निवास) सकाळी ठिक 10.00 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे स्वरूप श्री. संत श्रेष्ठ जगनाडे महाराज जयंती, दिपप्रज्वलन, प्रतिमा पुजन व नमन, नुन कार्यकारीणी सदस्यांचे, सभासद व कर्तुत्वाचा सत्कार,
भुसावळ - तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबरला सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने सर्व विभागांना दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भुसावळात तेली समाजातर्फे शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये संताजी महाराजांची प्रतिमा व शासननिर्णयाची प्रत भेट म्हणून देण्यात आली.
तेली समाजाचे आराध्यदैवत श्री.संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती रविवार दि. 8. डिसेंबर रोजी सर्व राज्यभर साजरी होत आहे.राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात जयंती साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कामगार कल्याण मंडळ कार्यालय चिंचवड या ठिकाणी तेली समाजाच्या महिला कार्यकर्त्यांच्या वतीने संताजी महाराज जगनाडे यांची प्रतीमा भेट देण्यात आली
जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना दिले पत्ररावेर - शासकीय कार्यालयांत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्याचे शासकीय आदेश आहेत. यासंदर्भात नगरसेवक अॅड. सूरज चौधरी यांनी आज जळगाव येथे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन शासनाचे पत्र दिले.