औरंगाबादला, प्रतिनिधी, औरंगाबाद येथील तेली समाजाचे नेते अनिल मकरिये यांना औरंगाबाद मध्य मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी आज उघोग राज्यमंत्री अतुल सावे यांच्या कडे तेली सेना, तेली समाजाच्या वतीने करण्यात आली.अतुल सावे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की औरंगाबाद मध्य मतदार संघात तेली समाजाचे 75 हजार कुटुंबे आहे. तेली मतदार लक्षणीय आहे. हा समाज नेहमी भारतीय जनता पक्षा सोबत राहत आलेला आहे.
समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अमरावती (प्रतिनिधी) : शनिवारी १९ ऑक्टोबर रोजी जयभारत मंगलम येथे करण्यात आले. आपला समाज हाच आपला परीवार, अशी भावना ठेऊन आपल्या या पारिवारीक कार्यक्रमाला समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाजाचे आराध्यदैवत सतांजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे सर्व संचालक मंडळद्वारे पूजन करण्यात आले.
परळी वैजनाथ तेली समाज श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबरला सर्व शासकीय,निम शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने नुकतेच परित्रक काढले आहे. त्यामुळे शहर व तालुक्यातील सर्व कार्यालयात जयंती साजरी करण्याचे आवाहन तेली युवक संघटना व शनैश्वर प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.
अहमदनगर शहर व जिल्हा तेली समाज संताजी विचार मंच अहमदनगर, भव्य मोफत वधु - वर पालक परिचय मेळावा, अहमदनगर - 2019, रविवार दि. 1 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 ते सायं 6 वाजेपर्यंत सर्व समाज बंधू-भगिनींनो... महाराष्ट्राचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहमदनगर शहरामध्ये भव्य मोफत तृतीय राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा होत आहे. या निमीत्ताने आपले स्वागत करण्यास अ.नगर शहर व जिल्हा तेली समाज, संताजी विचार मंच अहमदनगर उत्सुक आहे. तरी आपल्या मुला-मुलींची नाव नोंदणी करावी हि नम्र विनंती.
जाऊ संताजींच्या गावा .. !
श्रावण मास श्री संताजी महाराज जगनाडे समाधी मंदिर सुदुंबरे येथे ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन व किर्तन सोहळा. पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, दु.१२ ते १ गाथा भजन सायं.४.३० ते ५.३० हरिपाठ, ५.३० ते ७ संगीत भजन व रात्री ७ ते ९ हरिकिर्तन व नंतर हरिजागर होईल. प्रारंभ मिती श्रावण वद्य.10. रविवार दि. 25/8/2019 तर सांगता मिती श्रावण वद्य.१३.बुधवार दि.२८/८/२०१९ रोजी होईल