यवतमाळ - तेली समाज विवाह व सांस्कृतीक मंडळ यवतमाळ रजि नं.१७९ द्वारे दिनांक २० जानेवारी २०१९ ला संताजी मंदिर संकट मोचन रोड यवतमाळ येथील भाषणात सकाळी ११ वाजता पासून सर्व शाखीय तेली समाजाच्या उप वधु वर परिचय मेळाव्याचे मोठ्या थाटामाटात आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात उप वधु वर परिचय पुस्तीकचे प्रकाशन सुध्दा मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
२५ डिसेंबर नरखेड: संताजी मंदिर, नरखेड येथे संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विधीवत पुजना, आरती व माल्यार्पण करून मान्यवरांचे हस्ते महाराजांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवी देवरावजी टेकाडे, विशेष अतिथी खासदार कृपाल तुमाने, मुख्याधिकारी शेखर गुल्हाने, डॉ.महेंद्र धावडे, जि.प.सभापती उकेश चव्हान
वर्धा : वर्ष २०१९ मध्ये राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती, राष्ट्रीयदिनाचे कार्यक्रम मंत्रालय, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये साजरे करण्यासाठी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने २६ डिसेंबर रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. या परिपत्रकात महाराष्ट्राचे थोर संत व तेली समाजाचे आराध्य दैवत संतश्री जगनाडे महाराज जयंती ८ डिसेंबर २०१९ रोजी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
समस्त तेली पंचमंडळ चाळीसगाव जिल्हा जळगाव च्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह. मूर्तीपूजन दिनांक 30/12/2018 रविवार रोजी सकाळी आठ वाजता ठिकाणी संताजी मंदिर चाळीसगाव. किर्तन सप्ताह दिनांक 30/12/2018 ते 6/1/2019 रात्री 9 ते 11 महाप्रसाद दिनांक 6/1/2019 रविवार सकाळी अकरा ते तीन पर्यंत संपन्न होईल.
उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्हा तेली समाज सेवाभावी संघ शाखा कळंब च्या वतीने आज कळंब शहरात संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी समाजाचे जिल्हाअध्यक्ष रवि कोरे आळणीकर,जेष्ठ मार्गदर्शक तथा माजी जि प सदस्य कोंडाप्पा कोरे ,जिल्हा कोषाध्यक्ष महादेव मेंगले,उस्मानाबाद तालुकाध्यक्ष दत्ताञय बेगमपुरे,सुर्यकांत चौधरी आदि