Sant Santaji Maharaj Jagnade
दि. ०८. डिसेंबर संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्ताने व 10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिवस या औचित्याने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स तसेच अहमदनगर जिल्हा व शिर्डी शहर तेली समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "संतांची थोरवी" निबंध स्पर्धा व "विश्वकल्याण" क्रांतिकारक व राष्ट्रभक्ती या विषयावर वक्तृत्व / भाषण स्पर्धा आयोजित केली आहे.
अहमदनगर जिल्हा तेली समाज व शिर्डी शहर तेली समाजाचे वतीने दि.2/12/2019 रोजी तेली समाजाचे आराध्य दैवत व संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे लेखक श्रीसंत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची महाराष्ट्र शासनाने दि.8 डिसेंबर या तारखेला जयंती साजरी करण्याचे अध्यादेश जाहीर केले याचे औचित्य साधून अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक गावात शासकीय कार्यालयात तसेच शैक्षणिक संस्थामध्ये संताजी महाराज यांची प्रतिमा देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिर्डी येथून सुरवात करण्यात आली.
२०१८ मध्ये शासनाने जारी केलेल्या आदेशामध्ये तेली समाजाचे आराध्यदैवत भक्तश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांची ८ डिसेंबर रोजी जयंती सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयामध्ये साजरी करण्यात यावी असे नमूद करण्यात आलेली आहे यासाठी रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी,रत्नागिरी, माहिती संचालनाय,रत्नागिरी, जिल्हा पोलिस अधीक्षक रत्नागिरी,मुख्याधिकारी रत्नागिरी नगरपालिका,
देवगड : देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळाच्यावतीने देवगडमधील विविध शासकीय कार्यालयात संत जनगाडे महाराजांची प्रतिमा भेट स्वरूपात देवून जनगाडे महाराजांची जयंती शासनाच्या आदेशानुसार ८ डिसेंबर रोजी कार्यालयात साजरी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
पुणे : संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती ८ डिसेंबर रोजी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी केली जाणार आहे. याबाबत राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे. संताजी महाराज हे संत तुकाराम महाराज यांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक प्रमुख होते. त्यांच्या अभंग गाथेचे लेखनही संताजी महाराज यांनी केलेले आहे.