परभणी तेली समाज - महाराष्ट्र राज्य शासणाच्या सामान्य विभागातील संदर्भिय शासण निर्णयानुसार व दरवर्षी साजरा होणाऱ्या संत श्री संताजी जगनाडे महाराज याची जयंती महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी या आनुषंगाने आज दि ७/१२/१९.रोजी सर्व समाज बांधव यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका,
श्रीरामपूर तेली समाज - संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती दि. ८ डिसेंबर रोजी साजरी करण्यात येणार असून सर्व शासकीय कार्यालयांनी जयंती साजरी झाल्यानंतर संत जगनाडे महाराज यांची प्रतिमा कार्यालयात दर्शनी भागात लावावी, अशी मागणी पत्रकाद्वारे श्रीसाई संताजी प्रतिष्ठान शिडी, अहमदनगर यांनी केली आहे. संबंधित कार्यालयाला श्री संत जगनाडे महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली आहे.
वाल्हे, ता. २३ : श्री संत संताजी जगनाडे महाराज पालखी सोहळ्याचे सोमवारी सायंकाळी वाल्हे (ता. पुरंदर) येथे आगमन झाले. पालखी सोहळा तेली आळीमध्ये विसावला होता. मंगळवारी सकाळी पालखी सोहळा आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाला.
श्री. अरूण इंगवले
संतपरेपरेतील अनुल्लेखाच्या ग्रहणाने ग्रासलेला तेजस्वी तारा म्हणून संताजी जगनाडे यांचा उल्लेख करावा लागेल. तुकारामांच्या प्रभावलीत वावरणार्या चौदा टाळकर्यात रामेश्वरभट्ट, महादजी कुलकर्णी, कोंडाजी लोकरे, मालोजी गाडे, कान्होबा यांचा समावेश असला तरी, तुकोबांच्या हृदयात स्थान असणारे सहकारी होते गंगाजी मावळ आणि संताजी जगनाडे. मालोजी गाडे तुकोबांचे जावई होते. आणि कान्होबा पाठचा भाऊ होता.
तेली समाजातील महान विभुती (भाग 8) -
सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
संताजी महाराजांना तेली समाजाने आपले दैवत म्हणून स्विकारले आहे. तुकाराम महाराजांच्या 14 टाळकर्यांपैकी सर्वात महत्वाचे शिष्य असा त्यांचा लौकिक आहे. ते तुकारामांसोबत कायम सावली सारखे असत. संताजी जगनाडयांमुळेच तुकाराम लोकांना कळले. म्हणुनच म्हणता, होता संताजी सखा म्हणून वाचली गाथा आणि कळला तुका.