Sant Santaji Maharaj Jagnade
या मंदिराच्या स्थापनेमागेही आख्यायिका आहे. तेली समाजाचे श्री संत कडोजी महाराज मंदिरातील गादीचे आठवे वारसदार शांताराम महाराज भगत यांनी ही आख्यायिका सांगितली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीसंत कडोजी महाराज दरवर्षी विठ्ठलचे दर्शन घेण्यासाठी पायी वारी करत असत. एकदा ते कार्तिक शुध्द एकादशीला पंढरपूरला निघाले असता वाटेतच त्यांना पांडुरंगाचा साक्षात्कार झाला.
उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाच्या वतीने सलग १० व्या वर्षी उस्मानाबद शहरातील ह.भ.प.मुकुंद महाराज कोरे यांच्या निवासस्थानी वैष्णव नगर वरूडा रोड येथे सकाळी १० ते १२ हरिकिर्तन होईल. या किर्तनास गुरूवर्य महादेव महाराज तांबे,व संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी यांच्या उपस्थितीत. ह.भ.प. भागवत महाराज कबीर- संत कबीर महाराज फड व मठ, पंढरपूर यांचे किर्तन होईल.
श्रीक्षेत्र पैठण- श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती सोहळा दि. ८ डिसेंबर २०१८ वार शनिवार रोजी श्री संताजी महाराज मंदिर , श्री संताजी तिळवण तेली धर्मशाळा , श्रीक्षेत्र पैठण येथे आयोजित करण्यात आला आहे , तरी आपल्या समाजाचे आराध्य संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती करिता समस्त समाजबांधवांनी व संताजी भक्तांनी सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी
दि.८ डिसेंबर २०१८ रोजी सालाबाद प्रमाणे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व तेलीसमाज बंधु-भगिनी यांनी मोठ्या संख्येने सहपरिवार उपस्थित राहुन मिरवणुकीची शोभा वाढवावी आसे आव्हान करण्यात आलेले आहे.
संताजी स्नेही मंडळ, चामोर्शी तेली समाजाच्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्य समाज प्रबोधन व किर्तन कार्यक्रम ०८ डिसेंबर २०१८ (शनिवार) दुपारी १.०० वाजता स्थळ : बाजार चौक, नगरपंचायत, चामोर्शी. अध्यक्ष मान.संजय येरणे, प्रसिद्ध साहित्यिक तथा संताजी जगनाडे एक योद्धा या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक प्रमुख वक्ते मान.दिलीप तेली प्रसिध्द विचारवंत, जळगांव किर्तनकार मान. तुषार सुर्यवंशी, सप्तखंजेरी वादक, नागपुर (सत्यपाल महाराज यांचे शिष्य)