राजगुरूनगर : श्री संत संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळाकरिता पन्नास कोटींची मंजुरी मिळाली आहे, परंतु ती पुरेशी नसल्याने पाचशे कोटी रुपये तरतूद मिळवण्याकरिता सरकारकडे पाठपुरावा करणार असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे महासचिव डॉ. भूषण कर्डिले यांनी येथे केले.
नागपूर - ओबीसी समाज समाजामधील तेली समाज हा एक महत्त्वाचा असून हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विखुरलेला आहे. विदर्भातील गावागावांमध्ये या तेली समाजाची संख्या लक्षणीय असून राजकारणाची दिशा बदलण्याची ताकद या तेली समाजाचा मध्ये आहे.
सातारा येथे महाराष्ट्र प्रांतीय तैलिक महासभेच्या वतीने तेली समाजाचा भव्य मेळावा, गुणवंत विद्यार्थी गौरव, रोख बक्षीस वितरण, शिष्यवृत्ती प्रदान आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील तेली समाजातील 85% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र प्रांतीय तैलिक महासभा आणि संताजी अखिल तेली समाज संघटना, आर्वी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि नामवंतांचा सत्कार समारंभ आर्वी येथील आशिर्वाद मंगल कार्यालय, जाजुवाडी येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.
20 जुलै 2025 रोजी वर्धा येथील संताजी सभागृह, कृष्णनगर येथे तेली समाजाच्या वतीने एक भव्य गुणगौरव आणि सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच समाजातील ज्येष्ठ नागरिक, यशस्वी उद्योजक आणि पीएचडी प्राप्त समाजबंधवांचा गौरव करण्यात आला.