श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड आयोजित तेली समाज वधू-वर मेळावा उत्साहात संपन्न
पुणे, दि. १४ – श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड ही संस्था गेल्या १७ वर्षांपासून वधू-वर मेळाव्याचे आयोजन करत आहे. समाजहिताचे हे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रज्ञान शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
सातारा जिल्ह्यातील तेली समाजाच्या मंदिरासाठी जागा लवकरच उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी घोषणा ना. महेश शिंदे यांनी केली. त्यांनी सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केले.
छत्रपती संभाजीनगर तेली समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळावा रविवारी मातोश्री लॉनवर स्व. देवीदास बाबुराव साबणे नगरी येथे उत्साहात संपन्न झाला. खा. संदीपान भुमरे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे होते.
लातूर: विरशैव तेली समाजाने गेल्या 50 वर्षांपासून जपलेली अखंड परंपरा यावर्षीही महाशिवरात्रीच्या निमित्ताने साजरी करण्यात आली. श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान येथे अमावस्येच्या दिवशी गंगाजल अभिषेक व मानाची काठी लावून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाजाचे अध्यक्ष श्री किशोर भुजबळ यांच्या हस्ते मानाच्या काठीचे पूजन करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा - २०२५ व सामुदायिक विवाह सोहळा वेळ - सकाळी ९ ते सायं. ६.०० वा. रविवार दि.०९ मार्च २०२५ फॉर्म भरुन मो. 9130401599 या नंबरवर पाठवा मेळाव्याचे ठिकाण : मातोश्री लॉन्स, विमानतळ शेजारी, धुत हॉस्पिटल जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर