कन्नड : शहरातील लिंगेश्वर महादेव मंदिर येथे प. पू जगनाडे महाराज शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था व तिळवण तेली समाज बांधव कन्नड यांच्यावतीने श्री संत शिरोमनी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती रविवारी साजरी करण्यात आली. संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
वालसावंगी - येथे रविवारी (ता.०८) तारखेला सकाळी ९ वाजता विठ्ठल मंदिर येथे तेली सम जाचे आराध्य दैवत संत संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी झालेल्या कार्यक्रमात गावातील मान्यवरांच्या हस्ते संत जगनाडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पाटण : येथील समाज बांधवांच्या वतीने संत तुकाराम महाराज यांच्या गाथेचे लेखनकर्ते आणि संवर्धक संताजी महाराज जगनाडे यांची ४०० वी जयंती पश्चिम महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेचे उपाध्यक्ष पोपटराव गवळी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
मंगळवेढा : श्री संत जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती नगरपरिषद मंगळवेढा, श्री संत दामाजी मंदिर व रिद्धी सिद्धी गणपती मंदिर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विरशैव लिंगायत तेली समाज मंगळवेढ्याचे सर्व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
गंगापूर दि.८ डिसेंबर: श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची यांची ४०० वी जयंती साजरी करण्यात आली संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त गंगापूर मध्ये संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली.