अहमदनगर- संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या शिकवणीनुसार तेली समाजाची वाटचाल सुरू आहे. प्रत्येकाने एकमेकांशी आपुलकीने व प्रेमाने वागावे. श्री संताजी महाराजांनी जगद्गुरु संत तुकोबाराय यांची बुडालेली गाथा पुन्हा तंतोतंत लेखन करून समाजापुढे आणली.
खामगाव - संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंब्रे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई मथाबाई हे विठ्ठलभक्त होते. त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. संत श्री जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्या पैकी एक झाले.
वालसावंगी येथे शुक्रवारी (ता.०८) तारखेला सकाळी ९ वाजता विठ्ठल मंदिर येथे तेली समाजाचे आराध्य दैवत संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
मुदखेड,दि.८ तहसील कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शासन निर्णयानुसार तहसील कार्यालयात तहसीलदार मुगाजी काकडे यांच्या हस्ते संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जयंती साजरी करण्यात आली.
सावरगाव : येथील ग्रामपंचायतीमध्ये श्री संतशिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी उपसरपंच राजू गिरडकर, सदस्य मंगेश दाढे, एकनाथ रेवतकर, विजय पाटील, ग्रामविकास अधिकारी अजय नितनवरे, शेषराव फुके, सुरेश जयस्वाल, पंजाब हिरुडकर, हिंमत नखाते