श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र तेली समाजाच्या विकासा साठी सदैव प्रयत्नशिल राहिलेले आहे. माननीय सुभाषजी घाटे यांच्या मार्गदर्शनात, नेतृत्वात श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र चे राज्यभरात संघटनात्मक संरचना सुरू आहे. श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र चे भविष्यात संघटन प्रबळ होण्यासाठी वर्धा जिल्हाध्यक्षा या पदावर वर्धा येथील सामाजिक कार्यकर्त्या,
पैठणः प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य सोलार इंडस्ट्रीज उद्योजकांची पुणे येथे झालेल्या महाराष्ट्रव्यापी परिषदेमध्ये कमी वयात सर्वोत्कृष्ट सोलार उद्योगात कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य युवा उद्योजक (सोलार ऑफ द इयर या पुरस्काराने अजिंक्य भगवान मिटकर यास सन्मानीत करण्यात आले.
मुर्तिजापुर तालुका सर्व शाखीय तेली समाज बांधव तर्फे आयोजीत शहरात प्रथमच श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचे जीवन चरित्रावर आधारीत अडीच तासाचा धार्मिक नाट्यप्रयोग सादर होत आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथा ज्यांच्यामुळे आज जगाला ज्ञान देण्याकरिता उपलब्ध आहेत, असे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनावरील जिवंत देखावा नाट्यस्वरूपात जनतेला पहावयास मिळणार आहे.
सोनई: संगमनेर येथील उद्योजक व महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष प्रदीप करपे यांना उंबरे येथील श्री छत्रपती प्रतिष्ठानाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कारवितरण रविवारी (ता. ९) सायंकाळी ४ वाजता उंबरे येथील श्री हनुमान मंदिर सभागृहात होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर: विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तेली समाजातील महिलांचा नुकताच राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रारंभी, तेली समाजाचे दैवत संतश्री जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना सावे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार हे महिलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने संवेदनशील असून,