Sant Santaji Maharaj Jagnade
अर्धापूर - श्रीसंत संताजी जगनाडे महाराज यांनी केलेले कार्य प्रेरणादायी उर्जा निर्माण करणारे असून त्यांचे विचार घरा घरात पोहचावे असे आवाहन जेष्ठ पत्रकार निळकंठ मदने यांनी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना दि.८ गुरुवारी रोजी व्यक्त केले आहे. युवाच्या वतीने श्रीसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार सखाराम क्षीरसागर, प्रमुख वक्ते जेष्ठ पत्रकार निळकंठराव मदने प्रा. संतोष लंगडे,
लोहारा : जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग, इंद्रायणी नदीत बुडवलेल्या गाथा पुन्हा मिळवून लिहून काढण्याचे काम संत संताजी जगनाडे महाराजांनी केले. तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यांपैकी एक होते. दोघांची कर्मगाथा, जीवनगाथा एकमेकांशिवाय अपूर्ण ठरते. संत तुकाराम महाराजांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणारे संत तुकारामांचा पट्टशिष्य, महाराष्ट्रातील तेली समाज घडविणारे
मुदखेड, दि. ८ : तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शासन परिपत्रकानूसार शहरातील मुदखेड तहसील कार्यालय व पंचायत समितीमध्ये
साजरी करण्यात आली. येथील तहसीलदार सुजीत नरहारे यांच्या सूचनेनुसार तहसील कार्यालयात सकाळी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक जनार्दन पिन्नलवार यांच्या हस्ते करण्यात आले.
आरमोरी, - राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने 26 डिसेंबर 2018 रोजी काढलेल्या परिपत्रकात महाराष्ट्राचे थोर संत व तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती 8 डिसेंबर रोजी साजरी करण्याकरिता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
जामनेर: शहरातील कमल हॉस्पिटल येथे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी महिला आघाडी व प्रदेश तेली महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.