महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा समाज जोडो अभियान अंतर्गत समाजमाता कै.केशरकाकू यांचे बीड नगरीत भव्य स्वांगत आ. संदिप क्षिरसागर आणि समाज बांधवांनी केले.समाजमाता माजी खासदार कै. केशरकाकू सोनाजीराव क्षिरसागर यांचे निवासस्थान संत संताजी महाराज पादुका व गाथाचे पूजन धार्मिक विधीने क्षिरसागर कुटुंबीया कडून करण्यात आले.
श्री संत संताजी जगनाडे महाराज सेवा समीती टाकळघाट यांचे वतीने श्री संताजी महाराज यांची चरण पादूका व प्रतिमाची स्थापना कार्यक्रम चे अध्यक्षतेखाली मुख्य अतिथी श्री रमेशजी गिरडे दिनांक 20-02-21 रोजी समीतीचे वतीने भव्य तेली समाज बांधवांचा मेळावा सायंकाळी 06-00 वा पार पडला.या प्रसंगी समीतीला 2 हजार फूट जागा श्री प्रशांतजी अवचट यांनी दान दिली.
श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी संताजी जगनाडे महाराज चौक यवतमाळ येथे साजरी करण्यात आली असता साजरी करत असतात संताजी जगनाडे महाराज यांच्या विचारांवर व गाडगे महाराज यांच्या विचारांवर अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले असता सदर कार्यक्रमला विरोधी पक्षनेता चंदू भाऊ चौधरी अजय किन्हीकर तेली समाज महासंघ जिल्हा उपाध्यक्ष किशोर भाऊ थोटे संचालक नरेश भागडे संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यवतमाळ
कसबेडिग्रज : शासनाकडून ओबीसीचे आरक्षण रद्द केले आहे. आता ते फक्त निवडणुकीपुरते मर्यादित असले तरी यापुढे सर्व क्षेत्रातील आरक्षण रद्द होण्याची चिन्हे आहेत. तेव्हा असंघटित लोकांवर अन्याय होईल. यापुढे ओबीसी आरक्षणासाठी सर्वांनी संघटित होणे महत्त्वाचे आहे, म्हणूनच संघटित लोकच यापुढे सुलभ पद्धतीने जीवन जगतील, असे मत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कोषाध्यक्ष गजानन शेलार यांनी व्यक्त केले.
जालना,२१ डिसेंबर समाज जोडो अभियान अंतर्गत सुदुंबरे येथून निघालेले श्री संत जगनाडे महाराज यांच्या रथयात्रेचे जालन्यात जंगी स्वागत सकल तेली समाजाच्या वतीने करण्यात आले. या रॅलीदरम्यान चिमुकले आबालवृद्ध व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या रॅलीदरम्यान भजन टाळ मृदुंग पावलांच्या सुरात तसेच महिलांनी फुाडी खेळून व फेटे परिधान करून आनंद घेतला यावेळी रथयात्रा सोबत तेली समाजाचे