सांगली शहर लिंगायत तेली समाजाच्या वतीने दिनांक 11 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी ९ .०० वाजता सांगली जिल्ह्यातील तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व सकाळी ११ वाजता भव्य राज्यस्तरीय उपवर वधु -वर व पालक परिचय मेळावा आयोजित केलेला आहे. मेळावा ठिकाण : फल्ले मंगल कार्यालय, सांगलीवाडी टोलनाक्याजवळ, सांगलीवाडी. ता. मिरज, जि. सांगली .
संताजी मंडळ नाशिक जिल्हा यांचा विद्यार्थी गुण गौरव समारंभ आज नाशिक येथे संपन्न झाला.या समारंभ साठी अध्यक्ष स्थान दानशुर व्यक्तिमत्व मा.श्री.संतोषनाना चौधरी, भिष्माचार्य प्रा.गुरूवर्य मा.श्री.वंसतरावजी कर्डिलेसाहेब, मुलुख मैदानी तोफ मा. श्री. गजुनाना शेलार साहेब,व महाराष्ट्राचे भुषण कडकडती बिजली प्रा.डाॅ.मा.श्री. भुषणजी कर्डिले साहेब.
अखिल भारतीय सर्व तैलिक साहू युवक युवतियों का निशुल्क का परिचय सम्मेलन फार्म 2018
दिनांक 21 अक्टूबर 2018 रविवार, स्थान इन्दौर के बास्केट बॉल परिसर, कार्यालय :-6 ब्रम्हबाग कॉलोनी वी आय पी रोड मरीमाता चौराहा इन्दौर मध्य प्रदेश आयोजक मध्य प्रदेश तैलिक साहू सभा भोपाल मध्य प्रदेश तैलिक साहू समाज जिला इंदौर मध्य प्रदेश, समाज के सभी तेली समाज के सदस्य भाग ले सकते है ।
सोलापुर बार्शी - वीरशैव लिंगायत तेली समाज संस्थेच्यावतीने २० मे रोजी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह येथे राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ कचरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच तुळजापूर रस्ता येथे नव्याने बांधण्यात आलेल्या समाज भवनाचे लोकार्पण होणार आहे.
औरंगाबाद : जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यमंदिरात औरंगाबाद जिल्हा तेली समाजातर्फे नुकताच तेली समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न झाला. खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी तैलिक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्तअण्णा क्षीरसागर हे होते.