Sant Santaji Maharaj Jagnade
नागपूर : श्री संताजी स्मारक समितीद्वारे संत जगनाडे चौक नंदनवन नागपूर येथे ८ डिसेंबरला मोठ्या उत्साहात श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. जगनाडे महाराज यांचा ३९७ वा जन्मोत्सव ब्रह्ममुहुर्तावर सकाळी ६ वा. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. यशवंत खोब्रागडे व डॉ. गणेश मस्के यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पंचामृताने स्नान करून विधिवत पूजा करण्यात आली.
संत संताजीनी दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश गोंडवाना विद्यापीठात जयंतीगडचिरोली : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.अनेक संतांनी समाजाच्या उत्थानासाठी कार्य केले. संत संताजी जगनाडे महाराजांचे विचार आणि साहित्य हे प्रेरणादायी आहेत. संतांनी नेहमी सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला, असे प्रतिपादन विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. सुरेश रेवतकर यांनी केले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
धुळे - तेली समाजाचे संत श्रेष्ठ संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांचे ३९७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्ष कैलास चौधरी, सचिव रवींद्र चौधरी, कार्याध्यक्ष मनोज चौधरी, शहर उपाध्यक्ष चंद्रकांत चौधरी, शहर सचिव राकेश चौधरी यांनी श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी वर्षभर चालणा-या जनजागृती प्रबोधन यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
निमगाव केतकी - श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या ३७० व्या जयंतीनिमित्त निमगाव केतकी येथे अखिल तेली समाज संघटना व निमगाव केतकी येथील तिळवण तेली समाजाच्या वतीने सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्ट मंदिरामध्ये श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शिर्डी - तेली समाजाचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ श्री संताजी महाराज जगनाडे तेली यांच्या जयंती निमि त्त शिर्डी येथील वाचनालयात तेली समाजाचे सदगुरू श्रेष्ठ संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची ३९७ वी जयंती साजरी करण्यात आली. शिर्डी शहरातील जेष्ठ सम जि बांधव व प्रगतशील शेतकरी हभप यशवंतराव वाघचौरे यांचे हस्ते प्रतिमपूजन करण्यात आले