तिळवण तेली समाजातील नगर जिल्ह्यातील पहिले डॉक्टरकीची परीक्षा उत्तीर्ण झालेले थोर समाज सेवक डॉ एस. टी. महाले यांच्या कार्याची थोडक्यात माहिती खाली देत आहोत. डॉ. एस. टी. महाले यांचा जन्म १४ मे १९२५ रोजी सिन्नर जिल्हा नाशिक येथोल दापूर या गावात एका सामान्य तेली कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सिन्नर व नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे झाले. शिक्षण चालू असतानाच व बाह्य जगाचा कोणताही अनुभव नसलेल्या डॉक्टराचे वडील ते ११ वर्षांचे असताना वारले.
तेली गल्ली, एप्रिल 2010
पुणे - तिळवण तेली समाज संस्था भवानी पेठ पुणे या संस्थेची निवडणूक डिसेंबर २००८ मध्ये झाली होती. यावेळी परिवर्तन पॅनेलचे १५ जन बहुमताने निवडुन आले. पहिल्या प्रथम श्री. रामदास धोत्रे संस्था अध्यक्ष झाले. त्यांनी पुर्वी ठरल्या प्रमाणे आपला अध्यक्ष पदाचा राजीनामा समाज विश्वस्ता कडे जमा केला. त्या नंतर १५ सदस्यांच्या मिटींग मध्ये श्री. संजय दत्तात्रय भगत यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले.
एप्रिल 2010
पुणे :- कै. डॉ. भाऊसाहेब सहिंद्रकर चॅरीटेबल ट्रस्टच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त नुकतेच ज्येष्ठ अभिनेते श्री, जयराम कुलकर्णी व अभिनेते श्री. विजय मिश्रा यांच्या हस्ते श्रीमती सुमन सहिंद्रकर यांच्या अध्यक्षतेखाली सहकारनगर नं. १ येथील तळजाई वसाहतीतील गरीब व गरजू लोकांसाठी धर्मार्थ क्षेत्र चिकीत्सा आणि दंत चिकीत्सालय सुरू करण्यात आले या उद्घाटनानिमित्त
एप्रिल 2010, लेखक : श्री. मोहन देशमाने
महिपतीने बाकी काय केले या पेक्षा एक गोष्ट बरी केली. हा एकच धागा शिल्लक राहिला. हा शिल्लकच नसता तर मी इतिहासात पूर्ण पूसून गेलो असतो. आता पुर्ण पुसण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आणि तो करू नये का ? त्या समुहाकडून हिच अपेक्षा होती. कारण ते त्या जातीत जन्मले आणि अहंकारात वाढले. अहंकार जपने हा त्यांच्या जगण्याचा महामार्ग आहे. त्या मार्गाने जे जाणार त्यांनी त्यांचे काम केले.
महिला आरक्षण व तेल्यांची जनगनणा यात आमचा काय संबंध ? (भाग 3 ) एप्रिल 2010
तुमचा पक्ष कोणता ? तुमचा नेता कोणता ? या गोष्टीशी आमची बांधीलकी शुन्य कारण तुम्ही सर्व मंडळी तेली म्हणुन जेंव्हा समाज पातळीवर - येता तेंव्हा तेल्यांच्या विकासाच्या गप्पा मारता पण तेल्यांच्या विकासाच्या संधी समोर येतात तेंव्हा तुमच्या पक्ष नेत्या समोर तुम्ही गप्प आसता हे वास्तव तुम्ही किती ही लपवले तर लपत नाही. महिला आरक्षण राज्यसभेत मंजुर झालेच आहे.