Sant Santaji Maharaj Jagnade
मंडल आयोगाच्या शिफारसी नुसार केंद्रात व प्रत्येक राज्यात इतर मागास वर्ग आयोग स्थापण्याची व्यवस्था झाली. काँग्रेसच्या काळात काँग्रेस विचार धारा माणनारे अध्यक्ष, सदस्य व तज्ञ नमले गेले. तरी सुद्धा सुशील कुमार शिंदेंनी मराठा कुणबी ही बनवेगीरी केलीच. फडणीसावर पर्यायाने बीजीपीवर ओबीसींवर जीव की प्राण. मी अनेक ओबीसी जवळुन पाहिलेत त्यांनी आपले जीवन बिजेपीत, आर.एस.एस. प्रणाली साठी अपर्ण केले आहे.
छत्तीसगड - या राज्यातील 12 वी परिक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. या मध्ये पहिला टॉपर धावेंद्र कुमार साहु हा 98.60 टक्के गुण मिळवून टॉपर मध्ये प्रथम आला आहे. गोपाल प्रसाद साहू 95.80 या तेली साहू समाजातील विद्यार्थांचे अभिनंदन साहू सेनेने केले आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
अमरावती चांदूर रेल्वेच्या पासुन दूर भुईखेड गावाच्या नावात खेड त्या मुळे गाव सर्व सुख सोईना पारख असलेले. पाऊस काळात तर कोणत्याही दिशेला चालत जावा या रस्त्यावर किमान दहा बारा मैल चिखल तुडवत जावे लागत होते यात जयराम गुल्हाणे वस्तीकरून रहात होते. वस्ती या साठी की गावात घर आहे पण शिवारात शेत नाही. त्यामुळे 1 मुली 2 मुलगे यांना मोठे करण्यासाठी ते गावात मिळेल ते काम. शिवारात मिळेल ती मजुरी करून वावरत होते. घर सावरत होते. याच झाकाळलेल्या घरात श्री. विठ्ललराव गुल्हाणे यांचा जन्म झाला. असेच झाकोळलेल्या घरात वावरत होते. मुलांना जगवलेे पाहिजे ही धडपड ती पुर्ण करण्यास दिवस अपुरा पडत होता.
तळेगांव दाभाडे दि. 13 :- सालाबादप्रमाणे दि. 11 एप्रिल रोजी तेली आळीतील मारूती मंदिर येथे हनुमान जयंती महोतसव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला.
पहाटे 5 वाजता प्रथेप्रमाणे तेली समाज सार्वजनिक गणेशोत्सव तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष संदिप पिंगळे यांच्या हस्ते श्रींच्या मुर्तीचा अभिषेक करण्यात आला. 5.30 ते 7 वा. या वेेळेत ह. भ. प. नितीन महाराज काकडे यांचे हनुमानजन्मावर कीर्तन झाले. संपूर्ण दिवसभर समितीच्या वतिने मंदिरामध्ये प्रसाद वितरित करण्यात आला. रात्री 8 वा. सौ. चित्रा जगनाडे, संदीप जगनाडे, पोपटभाऊ जगनाडे, तनुंजा जगनाडे यांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली.
नाशिक - तेली समाजासाठी कार्य करणार्या श्रीग्रुप फाउंडेशनच्या वतीने अयोजित वंचितांच्या वूध-वर मेळाव्यासाठी यंदा तब्बल 400 इच्छुकांची नावनोंदणी करण्यात आली होती. त्यात आर्थिक दुर्बल, अंध, मुक - बधिर, घटस्फोटित, विधूर, विधवा व वयस्कर वधू -वरांचा उत्स्फूर्त सहभाग होता. यानिमित्ताने त्यांच्यासाठी आयुष्यभराचे ऋणानुबंध जुळण्याचा योग आला होता.