Sant Santaji Maharaj Jagnade
श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी उत्सव, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह, स्थळ - श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर, बाभुळगांव रोड, लासुर स्टेशन, • प्रारंभ • मित्ती मार्गशिर्ष कृ. ९ दि.०५/०१/२०२४ शुक्रवार • सांगता • मिती पौष शु. १ दि. १२/०१/२०२४ शुक्रवार, मार्गदर्शक - ग्रामस्थ भजनी मंडळ व श्री संताजी महाराज भक्त परिवार, लासुर स्टेशन
रोहा तालुका महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा संस्थेच्या वतीने रायगड जिल्हा संपर्क मेळावा शनिवार दि. २३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी. ९.०० ते दु. १.०० वा. या वेळेत आयोजित करण्यात येत आहे. संमेलन स्थळ श्री जोगेश्वरी मातेच्या पावन भुमित आराधना भवन, बाजारपेठ, जैन मंदिरासमोर, नागोठणे, ता. रोहा, जि. रायगड. तरी सर्व तेली समाज बांधवांनी सहकुटूंब सहपरिवारासह कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित
तेली समाज संस्था, बाराभाटी / रेल्वे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम ०२ जानेवारी २०२४ रोज मंगळवार स्थळः-श्री.संत जगनाडे महाराज चौक बाराभाटी, तेली समाज संघटना, बाराभाटी च्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा आयोजित केला असून उपरोक्त कार्यक्रमास सर्वांची उपस्थिती राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
परमपूज्य संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी सोहळा समिती तर्फे 19 व 20/12/23 या दोन दिवशी उमरी /लवारी साकोली जिल्हा भंडारा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध सांस्कृतिक कार्यक्रम व प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती जागृतीचा कार्यक्रम श्री संत डोमाजी कापगते महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
अहमदनगर येथे रविवारी आयोजित तिळवण तेली समाज व संताजी विचार मंच ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित तिळवण तेली समाज वधू- वर पालक परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सात वर्षांपासून सुरू केलेला वधू-वर पालक परिचय मेळावा कौतुकास्पद असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांनी गौरवोद्गार काढले.