श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
कै. तुकाराम भिकुजी म्हस्के, यांना जेऊरकर म्हणून हाक मारीत. शिक्षण कमी मात्र व्यापारांत हुशार. गरीबी परिस्थिती हाताळून त्यांवर मात केली. तेल घाणीचा व्यवसाय. अंबिका तेल सोसायटीत सदस्य होते. अनुभव धंद्यात चांगला, मार्गदर्शन, करडी घेण्यांत व पारखून घेण्यांत हातखंडा.
श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
कै. बाबुराव सदोबा देवकर तेलीखुंटावर रहात. अत्यंत गरीब परिस्थितीत दिवस काढन त्यांनी त्यांचे हयातीत तीन मजली इमारत बांधली. शिक्षण इंग्रजी ५ वी पर्यंत काही वेळा ते इंग्रजीतून चांगले बोलणी करीत असत. त्यांना श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाबद्दल अभिमान असे ज्ञानेश्वरी त्यांची मुखोद्गत असे.
कै. हरिभाऊ भाऊ देवकर यांना हरिभट मामा म्हणून नावाने हाक मारीत असे. एकंदर चार भाऊ १) कै. रंभाजी भाऊ २) कै. हरिभाऊ भाऊ ३) कै. दगडूभाऊ ४) कै. सहादु भाऊ दाळ, मंडई येथील जे. श्री विठ्ठल मंदिरा करिता ज्याने जागा दिली ते कै. सावळेराम गुंडिबा देवकर यांचे ह सख्ख पुतणे होय. कै. हरिभाऊ यांना दोन पत्नीपासून दोन मुली झाल्या. एक मुलगी नागले घराण्यात दिली व दूसरी मुलगी साळुंखे घराण्यात दिली. त्यांना प्रत्येकी घर जागा देण्यात आली.
श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
कै. नामदेव विठोबा क्षिरसागर. सावकार हे सावकार म्हणन प्रसिद्ध असून या नावाने ओळखले जात. सोयरिक जमविणे, निवडणूक प्रचारात भाग घेणे यात त्यांचा हातखंडा असे. घोड्याचे शौकिन असत. त्यात त्यांची पारख उत्तम. तांगा पासिंगचे वेळी त्यांना बोलावून घेत. गरिबांबद्दल अस्था, तेव्हां त्यांचे सांगणेवरुन कामे होत व करवून घेत असत.
श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
कै. बाबुराव भिवसेन इंगळे, इंगळे हॉटेलवाले म्हणून जास्त प्रसिद्ध मॅट्रीक पर्यंत शिक्षण समाजाबद्दल आस्था १९५२ ते ७४ पर्यंत तेली समाजाचे विश्वस्थ. त्यांचे कारकिर्दीत पंजाब नॅशनल बँन्केस जागा भाड्याने दिली. वेळांतवेळ काढून समाज्याच्या कामात लक्ष व मार्गदर्शन. हे चौघे भाऊ कै. काशिनाथ भिवसेन इंगळे, कै. दशरथ भिवसेन इंगळे, बबनराव इंगळे व ते स्वतः कै. काशिनाथ व कै. दशरथ राव यांनी अत्यंत बिकट परिस्थितीस तोंड दिले.