Sant Santaji Maharaj Jagnade
श्री. राजेंद्र दशरथ पन्हाळे यांनी या व्यवसायात तसा बर्यापैकी जम बसवला. श्री. अभिजित श्रीराम पन्हाळ हे स्वत: पदवीधर आहेत. नोकरी न करता त्यांनी घरच्या राजुरच्या पेढ्यात लक्ष दिले. आज नुसता फक्त पेढा बनविणस 10/12 कामगार रोज राबत असतात. किमान 1000 किलो पेढा हा शिर्डी येथे जात आसते. दुध खरेदी, पेढा विक्री, पेढा निर्मीती हे सर्व श्री. अभिजीत पन्हाळे स्वत: पहात आहेत. आणी राजुर पेढ्याला प्रतिष्ठा देत आहेत.
श्री. संजय हे पदवीधर आहेत. आपल्या शिक्षणाचा उपयोग नोकरी मागे न जाता त्यांनी व्यवसयात लावला पक्षीय राजकारणा पासुन दुर राहुन व्यवसाय व समाजकार्य करणे हा छंद जोपासला नगर व पुणे येथील वधु-वर मेळाव्याला सक्रीय सहभाग. नगर जिल्हा तेली महासभेचे क्रियाशिल सदस्य श्री. संजयशेठ या माध्यमातुन जामखेड तालुका तेली बांधवांच्या विकासाला हातभार लावतात.
बीड मधील शिरूर येथे किंवा बालम टाकळी येथे डोक्यावर गोळ्या विकणारा मुलगा. पैसे नाहीत म्हणुन शिक्षक होऊ शकत नाही. गावात रोजगार नाही. पुण्याला जाण्यास पैसे नाहीत ट्रक मध्ये बसुन पुण्यात येतो काय ? नाना पेठेतील गंजाच्या मारूती मंदिरात रहातो काय ? आणी स्वत:चे नशीब घडवुन अनेकांचे नशिब घडवीणारे श्री. ताराचंद देवराय खरेच धडपडीचे व्यवहाराचे मानवतेचे वेगळे रसायन आहे.
गावा बाहेर आठरा गुंठे जागा खरेदी करून व्यवसायाला आधुनिकतेचे स्वरूप दिले. नव्या तंत्राने मसाले कांडप करू लागले. गावात वेशी जवळ दुकान सुरू केले. सोबतीला स्टीलभांड्याचे दुकान ही सुर केले. व्यवसायाला गती येण्यासाठी श्री. मनोहरशठे दळवी, श्री. चंद्रकांतशेठ वाव्हळ, श्री. तुकाराम शेठ दळवी, श्री. ज्ञानेश्वर शेठ दळवी यांचे मार्गदर्शन लाभले अल्प शिक्षीत गाव डोंगर दर्यातील परंतु श्री. मारूती यांनी बंधुंना सोबत ठेऊन लांडे बंधु मसालेवाले ही पत निर्माण केली.
माझे वडील रंगनाथ सहादु कोटकर त्यांना तीन भाऊ श्री. सावळेराम सहादु कोटकर, श्री. लक्ष्मण सहादु कोटकर, श्री. गणपत सहादु कोटकर असुन सर्व एकत्र कुटुंब होते व व्यवसाय पण एकत्र होता. सन 1960-78 दरम्यान तेली खुंट येथे ऑईल मिल व डाळ मिल चा व्यवसाय करीत होते त्या नंतर व्यवसायात वाढ होत असल्यामुळे जागा कमी पडु लागली म्हणुन आम्ही सरदार चौक स्टेशन रोड येथे भाडे तत्वावर जागा घेतली तेथे ऑईल मिल व एक डाळ मिल चालु केली.