भावपूर्ण श्रद्धांजली कै. गजानन (मंगल) श्रीधर घोडके
कान्हुर पठार, ता. पारनेर, जि. नगर
पुढे तिळवण तेली समाज अध्यक्ष पद भुषविण्याची संधी त्याना मिळाली. या पदाच्या माध्यमातुन त्यांनी समाज कल्यानास्तव अनेक उपक्रम राबविले. समाजोद्धाराची अनेक कामे करताना धार्मिक उपक्रम, हनुमान जयंती, मुंबई बाजार येथील समाजाचे हनुमान मंदिराचा जिर्णोद्धाार करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. जीवनाच्या अखेरच्या टप्यात ते अंत्यंत समाधानी होते.
शेकडो वर्ष महाराष्ट्राच्या सामाजीक, आर्थिक व धार्मिक परंपरेत दहशद मरजवणार्या ब्राह्मणी व्यवस्थेला हादरे देऊन बहुजन वर्गाला खंबीर करणारे संत संताजी श्री. संत संताजींच्या या महासंग्रामाला साथ सोबत देणारी त्यांची पत्नी खेडच्या कहाणे घराण्यातील. याच खेड म्हणजे आजच्या राजगुरूनगर मध्येच जन्मलेले व या मातीशी एकरूप झालेले श्री. दिलीप पोपटराव लोखंडे होत. खेडच्या सरदार चौकातील वेसी जवळ जगण्यचे साधन म्हणुन किराणा दुकान सुरू केले. समजण्याचे वय सुरू झाले तेंव्हा पासून पुड्या बांधणे विक्री करणे. गिर्हाईक संभाळणे हे संस्कार शालेय शिक्षणा बरोबर सुरू होते. गावातल्या शाळेतच 11 वी शिक्षण पुर्ण झाले. आणी मित्रा सोबत खेळ व इतर सामाजीक कामात रमता रमता ते व्यवसायात लक्ष देऊ लागले. सोबतीला दोन भाऊ व दोन बहिणी होत्या त्यांची जबाबदारी ते पुर्ण करीत होते
पारनेर तालुक्यात कान्हुर पठार हे गाव. गावाला व्यापाराची एैतिहासिक बैठक. आजूबाजूच्या गावांचे हे केंद्र स्थान. गाव तसे मोठ्या हमरस्त्या पासुन दुर गाव तसे पाऊसाने झीडकारलेले. परंतु व्यापारी पेठ असल्याने अनेक व्यवसायीक व पारंपारीक उत्पादन कर्ते समाज आपली मुुळे रोवुन पिड्यान पिड्या उद्योग धंदे करणारे. पुर्वी गावाला करडी, शेंंग पिकाने वरदान होते. दारात एक दोन बैल घाणे. जोडीला शेती या उद्योगावर विसंबुन राहून शेकडे वर्ष तेली समाज वावरत होता. बदलत्या काळात करडी गेली, शेंग पीक ही गेले जोडीला यंत्र युग आले. तेल घाने बंद पडले. बागायती शेती नाही जीराईत शेतीवर जगण्याची धडपड यशस्वी होत नव्हती. आणी या साठी या गावातली काही घोडके मंडळी निंबळक, चास नगर, पुणे व इतरत्र स्थीर झाले.
लग्न हे एक प्रत्येकाच्या जीवनाचा हा एक अतुट संबंध विवाह जुळवणे ही एक कसरत आसते. या साठी विवाह सुचक केंद्रे. वधुवर मेळावा, तेली गल्ली मासिका सारखी माध्यमे आपल्या परिने धडपडत असतात धडपड ही एक गरज निर्माण झालेली आहे. उच्च शिक्षीत, कमी शिक्षीत, शहरी, ग्रामीण या दर्या तशाच आहेत. शहरी भागात साधन सामग्री, मनुष्यबळ, दळण वळण या मुळे आज समाज सुलभ रित्या एकत्र येत आसतो. ही फार मोठी उनीव ग्रामीण भागात जाणवते. एक तर व्यवसाय, नोकरी या मुळे समाज सहज एकत्र होत नव्हता याची जाणीव होती म्हणुन पुणे ग्रामीण तेली समाजाचा सर्वे करून संघटनेला रस्ता मिळाला. गत वर्षी कुटूंब परिचय पुस्तीका प्रकाशनाच्या वेळेस आम्ही वधु-वर परिचय ही ठेवला.