Sant Santaji Maharaj Jagnade
आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 1) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
एक तेल्याचे पोर, एक शेतकर्याचे पोर, ते ही विदर्भातले, मध्यप्रदेशात तेंव्हा हा विदर्भ सी.पी.अॅण्ड बेरर म्हणुन समजला गेलेला हा भाग. निसर्गाने झिडकारलेला, शासानाने तडीपार केलेला हा भाग. आचार्य विनोबा भावे, उद्योगपती बजाज, सेवाव्रती सुशील नायर सहकार महर्षी दादासाहेब देशमुख यांची कर्मभुमी या भुमीत 1 एप्रिल 1954 मध्ये खा. रामदासजी तडस यांचा जन्म झाला.
- श्री. पोपटराव गवळी, अध्यक्ष प. महाराष्ट्र, म. तेली महा सभा.
घार आकाशात उंच उंच झेप घेते. परंतू त्या घारेची नजर आपल्या घरट्याकडे आसते. त्या घारीची नजर त्या घरट्यातील आपल्या पिल्लाकडे आसते. त्यावर होणारा अन्याय, त्यावर येणारी संकटे ती येतात का पहाते. आसे जेंव्हा दिसते तेंव्हा ते उंच आकाशी गेलेली असतानाही काही क्षणात घरट्याकडे येते. आपले घरटे शाबुत करते, या साठी तडस साहेबांकडे पहावे लागेल ते प्रथम मार्केट कमीटीचे संचालक झाले. त्या नंतर नगरसेवक, नगराध्यक्ष दोन वेळा आमदार अता खासदार झाले. ते आकाशात उंच उंच गेले परंतु आपली नजर आपल्या समाजाकडे देवून. हा समाज आहे म्हणुन ही सर्व झेप आहे. या समाजावर होणारे अन्याय या समाजावर येणारी संकटे ती दुर करणे माझे कर्तव्य आहे हे माणनारे.
देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथील एैतिहासिक " जंतर मंतर " येथे देशभरातील अतिमागासवर्ग व भटके विमुक्त जमातींच्या विविध संघटनांनी आपल्या मागण्यासाठी आंदोलन केले. सध्या असलेल्या ओबीसी आरक्षणाचे (२७ %) वर्गीकरण करून ओबीसी मध्ये ३ गट पाडावेत, त्यात पहिल्या गट भटके विमुक्त जाती (९ % आरक्षण), दुसऱ्या गटात अतिमागास जाती (उदा.तेली, माळी, गोवारी, कोळी - ९ % आरक्षण) व तिसऱ्या गटात इतर मागासवर्गीय जातींचा समावेश करावा या मागणीकरिता आंदोलन केले.
दिल्ली प्रदेश तैलीक साहू सभेच्या वतीने रविवारी दि. २७ मार्च २०१६ रोजी वसंतोत्सव व होली मिलन हा कार्यक्रम अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नवी दिल्ली येथे संपन्न झाला. यावेळी राष्ट्रीय उपाध्क्ष प्रल्हाद मोदी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. रामदास तडस, महामंत्री रामलाल गुप्ता, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डाॅ. प्रकाश सेठ, शुषमा शाहू व दिल्ली तैलिक साहू सभेचे अध्यक्ष एस राहुल उपस्थित होते.
पुणे :- श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुंदुंबरे या समाजाच्या शिखर संस्थेच्या सहचिटणीस पद नुकतेच रिक्त होते. संस्थेच्या कार्यकारणीची मिटींग श्री संत संताजी मंदिरात नुकतीच संपन्न झाली या वेळी संस्था अध्यक्ष श्री. जनार्दन गोपाळ शेठ जगनाडे यांनी श्री. दिपक सदाशीव पवार यांची नियुक्ती सहचिटणीस पद केली आहे.