Sant Santaji Maharaj Jagnade
डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 10) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी
समाज कार्य - भारतीय सौर पंचांग सुधारणा समितीचे ते प्रमुख होते म्हणुन भारतीय सौर पंचांग निमिर्तीचे / सुधारण्याचे काम त्यांनी केले. जे 22 मार्च 1957 (1 चैत्र 1879 शक) पासून लागु झाले. साहा हे नद्या जोड प्रकल्पाचे मुख्य प्रवतर्क होते. दामोदर खोर प्रकल्पांची मुळ संकल्पना त्यानी तयार केली.
डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 9) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी
प्रकाशन :- पाच संदर्भ पुस्तके त्यांनी लिहिली तर अनेक संशोधन पेपर त्यांनी प्रसिद्ध केलेत. सन 1935 मध्ये त्यांनी इंडियन सायन्स न्युज असोसिएशनची स्थापना केली व डॉ. मेघनाद साहा संपादीत सायन्स व कल्चर हे नियत कालिक प्रसिद्ध केले. सन 1919 मध्ये भारतात आईनस्टाईनचा थेअरी ऑफ रीलेटीव्हीटी (सर्व साारण व विशेष सापेक्षा वादाच्या) सिद्धांताची बातमी प्रसिद्ध झाली त्या वेळेस मेघनाद साहा व्यतिरिक्त भारतात कोणीही हि थेअरी समजणारे नव्हते. दुसर्या दिवशी मेघनाद सहा यांनी स्टेटसमेन या वृत्त पत्रात बेंडिग ऑफ लाईट चा अर्थ समजवला. सर्व साधारण व विशेष सापेक्षा वादाच्या सिद्धांताचे भाषांतर केले.
डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 8) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी
विज्ञानाला समजून घेण्यासाठी, संशोधनासाठी अर्थ सहाय्य मिळावे, भारतात विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास व्हावा यसाठी त्यांनी राजकारणात प्रवेश केला शास्त्रज्ञ म्हणुन नावारूपाला आलेले डॉ. मेघनाद साहा सन 1952 साली श्री. पंउीत नेहरू यांचे उमेदवाराचे विरूद्ध अपक्ष उभे राहून बर्याच मताधिक्याने लोकसभेवर निवडून आले.
डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 7) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी
डॉ. मेघनाद साहा यांचे संशोधन कार्य संशेधन कार्य :- अस्टेरो फिजिक्स किंवा विज्ञान या नवीन शास्त्राचा पाया त्यांनी रोवला तार्यांमध्ये अनुसंघटन घडून काही वस्तुमानाचे प्रकाश व उषणता उर्जेत रूपांतर होते हा जगप्रसिद्ध साहा सिद्धांत त्यांनी मांडला डॉ. मेघनाद साहा यांनी तार्यांचे तापमान व वर्ण यांचा निकटचा संबंध यांचा भौतिक कारणांचा शोध. औष्णिक आयनीभवन आणि त्याचा तार्यांच्या वर्ण पटाशी असलेला सबंध त्यांनी उलगडून दाखविला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे नाव गाजू लागले. या शोधांमुळे वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी आंतराराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली.
डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 6) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी
विवाह :- जून 1918 मध्ये त्यांचा विवाह श्रीमती राधाराणी यांचेशी झाला.