Sant Santaji Maharaj Jagnade
लग्न हे एक प्रत्येकाच्या जीवनाचा हा एक अतुट संबंध विवाह जुळवणे ही एक कसरत आसते. या साठी विवाह सुचक केंद्रे. वधुवर मेळावा, तेली गल्ली मासिका सारखी माध्यमे आपल्या परिने धडपडत असतात धडपड ही एक गरज निर्माण झालेली आहे. उच्च शिक्षीत, कमी शिक्षीत, शहरी, ग्रामीण या दर्या तशाच आहेत. शहरी भागात साधन सामग्री, मनुष्यबळ, दळण वळण या मुळे आज समाज सुलभ रित्या एकत्र येत आसतो. ही फार मोठी उनीव ग्रामीण भागात जाणवते. एक तर व्यवसाय, नोकरी या मुळे समाज सहज एकत्र होत नव्हता याची जाणीव होती म्हणुन पुणे ग्रामीण तेली समाजाचा सर्वे करून संघटनेला रस्ता मिळाला. गत वर्षी कुटूंब परिचय पुस्तीका प्रकाशनाच्या वेळेस आम्ही वधु-वर परिचय ही ठेवला.
ओतुर ता. जुन्नर या बाजार पेठेच्या गावात. रविशेठ या नावाला जशी किंमत तशी समाज पातळीवर ही आहे. कै. बाबुराव कर्डीले यांनी कष्टावर दोन मुले डॉक्टर केली. याच वेळी शिक्षणाची उमेद घेऊन रवींद्र शेठ शाळेत जात होते. शाळेची पुस्तके ही प्रगती पथावर घेऊन जात होते. परंतु भावांचे शिक्षण पुर्ण झाले पाहिजे ही वडीलांची इच्छा. या इच्छे मुळे वडिला बरोबर व्यवसायात रमु लागले. जवळ फक्त शिक्षण दहावी पास. या बळावर ते व्यवसायात शिरले. पुस्तकी ज्ञाना पेक्षा शिक्षणाची मोठी शाळा आसते भाकरीची शाळा. या शाळेत ते हळु हळु उभे राहु लागले यातूनच पहाता पहाता जीवनाच्या शाळेत ते पिएचडी पर्यंत शिक्षण घेऊ शकले.
मुंबई :- श्री. संताजी सेवा मंडळ तेली मुंबई या संस्थेतर्फे विद्यार्थी गुण गौरव हळदी कुंकू समारंभ या संस्थेच्या प्रांगणात संपन्न झाला. या वेळी संस्थे तर्फे श्री. मोहन देशमाने यांचा नांगरी सत्कार आयोजीत केला होता. या वेळी देशमाने यांनी समाजाचा इतिहासात. आज आन्याया बाबत असलेला संघर्ष मांडला. श्री. विजय चौधरी युवा अध्यक्ष तेली महासभा यांनी महासंघ करित असलेल्या कार्याचा आढावा घेतला.
स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण (भाग 4) - मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
नगर जवळील भिंगार भींगारची वेस त्या वेशीजवळ भाऊसाहेब पतकी यांचे घर या घराजवळ क्षिरसागर यांचे घर घर कसले तर मातीने सारवलेल्या भिंती त्याावर गंजलेले पत्रे. दोन तीन पातीली एक तेलाचा डबा त्या जवळ बसलेले वयोवृद्ध क्षिरसागर. मी त्यांना जेंव्हा पाहिले तेंव्हा या स्वातंत्र्याची किव करावी वाटली. या स्वातंत्र्य वीराने इंग्रज अधीकारी गोळीबार करतोय म्हणून ती गाडीच उलथी पालथी केली. या पैलवान बांधवाचे पायच कायमचे निकामी केले. शिक्षा भोगावी लागली स्वातंत्र्यात मिळाले काय तर हे बुड टेकत चालणे. मी समाजातील स्वातंत्र सैनिकांचा इतिहास गोळा केला. त्यांचे पुस्तक ही प्रसिद्ध केले. पण यातील बर्याच जनांच्या घरात आपल्यात स्वातंत्र्य सैनक होते याची जाणीव पुसट होत चालली आहे. त्या घरात ही अवस्था तर समाजाला किती जाणीव असावी.a
सौ. सुनीता रमेश भोज. अध्यक्षा, गुरूकृपा बचत गट, पुणे कार्याध्यक्ष उत्कर्ष भिशी मंडळ, कोथरूड
महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण सर्वजण विसरलेले आहोत. भारतात ओबीसींच्या 3744 जाती आहेत. त्यामुळे ओबीसील लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले पाहिजे. परंतु तसे होत नाही. त्यासाठी ओबीसींची जनगणना ब्रिटीशांनी 1931 साली केली होती. त्यानुसार ओबीसींची जातीनिहाय जनगणना तेव्हापासून 52 % च धरली गेली आहे. त्यानंतर ओबीसींध्ये प्रचंड वाढ होऊन टक्केवारी मध्येही वाढ झालेली आहे. परंतु जाणीवपुर्वक ओबीसींच जातीनिहाय जनगणना होऊ दिली नाही.