पालखी निघाल्या नंतर ४/५ वर्षींनी मी पांच वारकरी घरी जेवणास बोलावत असे. नंतर ती प्रथा बंद झाली. परंतु सेवा म्हणुन ९१/९२ साली आमचा हिशोब करून देत जा आपण दिवानजी आहात व मार्केट मध्ये असल्यामुळे बहुतेक ट्रस्टी व्यापारी असल्या मुळे ओळख होतीच त्याचा उपयाोग व मी तिळवण तेली समाजाचा हिशोब तपासणीस व नंतर जा. सेक्रेटरी होतो. त्याचे माध्यमातून महाराजांची सेवा करायला मिळाली अध्यक्ष माधवराव आंबीके व नंतर मेरूकर अध्यक्ष झाले नंतर सन २००० पासुन माझी सेक्रेटरी म्हणुन नेमणुक झाली
श्री. ताराचंद देवराय
सर्व समाज बांधवाना एक आनंदाची बातमी ज्या कार्यक्रमाची आपण गेल्या दोन वर्षांपासून वाट बघतोय तो कार्यक्रम म्हणजे "तिळवण तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा,औरंगाबाद." होतोय दि.२४०१२०१६ रोजी संत तुकाराम महाराज नाटयगृह,एन-५,सिडको,औरंगाबाद येथे.
तरी समाजातील उपवर-वधु नी मोठया संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.
जय संताजी
माझं १२ संपुन १३ व लागलेलं शाळेची सुट्टी संपुन शाळा चालु होण्याची लगबग नवीन कपडे, बुट, पुस्तक याचं आर्कषन अन घरात आपल्या संताजींची पालखी निघण्याची गडबड मी. आईला हट्टाला धरल मला पन पालखीला यायंचच. मी सारखा हट्ट धरला आई म्हणाली ती ह्यांना विचारेल आई आज विचारीन मग विचारीन माझी तगमग चालु होती. वडील माजघरात आल्यानंतर घरातल्या १, २ माणसांशिवाय त्यांच्याशी बोलायच हिंम्मत कोणालाही नव्हती. आईने विचारले आहो ह्या पोराला घ्याल का आपल्या बरोबर काही पडीलेली काम करील. वडीलांनी नाही म्हंटले
शेकडो वर्षा पासून पंढरपूरला पायी वारी करत विठ्ठल भेटीला जाण्याची परंपरा, वारकरी संप्रदायातील महान संतानी चालू केली. याच संतमंडळी मध्ये संत शिरोमणी तुकाराम महाराज देहूकर यांच्या निकटच्या शिष्यांपैकी व १४ टाळकर्यां पैकी एक असलेले आमचे संत श्री. संताजी महाराज जगनाडे (चाकणकर) यांची सुद्धा सुदुंबरे ता. मावळ, जि. पुणे या समाधी स्थळा पासून पालखी सोळहा सुरू केला गेला.
ओबीसीच्या टक्केवारीत वाढ होणारा आणि तो समाज शिक्षण, नोकरी, सत्ता या सर्वांमध्ये वाटा मागणार या सर्व कारणांमुळे ओ.बी.सी. ची जातीनिहाय जनगणनला होउ दिली जात नाही. असे मत श्री. रमेश भोज अध्यक्ष पुणे ओबीसी सेवा संघ, पुणे जिल्हा दि. २६/०६/२०१५ रोजी आरक्षणाचे जनक राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.