Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

श्री संताजी ब्रिगेड, पुणे स्थापन

Santaji Brigade

    तिळवण तेली समाजातील समाजहिताच्या गरजा लक्षात घेऊन पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात आज दि. ५/७/२०१५ चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर पुणे येथे श्री. रमेश भोज यांच्या अध्यक्षतेखाली श्री. विजय रत्नपारखी, सौ. राधिकाताई मखामले, श्री. दिलीप शिंदे, श्री. संतोष व्हावळ, श्री. प्रीतम केदारी, श्री. महेश अंबिके, श्री. गणेश चव्हाण, श्री. अनिल उबाळे, श्री. राजू हाडके, श्री. संदीप चिलेकर, श्री. सचिन काळे, श्री. सूर्यकांत बारमुख यांनी एकत्र येऊन विचरविनिमय करून नवीन संघटना स्थापना करण्याचे एकमताने ठरविले.

दिनांक 05-07-2015 23:24:37 Read more

श्री. संताजी महाराज यांच्या पालखीसाठी ज्ञानोबा भगत यांच्या बैलजोडीस मान.

santaji jagnade maharaj palkhi sohala bail jodi

    श्री. संताजी महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान श्री. क्षेत्र सुदुुंबरे येथुन दिनांक ८ जुलै २०१५ रोजी होत असुन महाराजांच्या पालखी रथासाठी या वर्षी श्री. ज्ञानोबा बाबूराव भगत रा. डोंजे, ता. हवेली, जि. पुणे यांच्या सर्जा-राजा या बैलजोडीस या वर्षाचा मान मिळालेला आहे. अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख श्री. अरूण काळे यांनी दिले.

दिनांक 04-07-2015 11:33:24 Read more

श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा - कार्यक्रम पत्रिका

श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा - कार्यक्रम पत्रिका (सुदुंबरे ते पंढरपूर )

मिती अधिक आषाढ वद्य ॥७॥ बुधवार दि. ०८/०७/२०१५ ते निज आषाढ वद्य. ॥१५॥शुक्रवार दि. ३१/०७/२०१५

दिनांक 26-06-2015 23:59:46 Read more

पाऊले चालती पंढरीची वाट

श्री. दिलीप फलटणकर

        सर्व धर्मातील, पंथातील, जातीतील अठरा पगड लोक वारीत सहभागी होतात. सामाजिक समतेच आणि एकात्मतेच दुसरं उदाहरण नाही. तिथं कोणी लहान नसतो, मोठा नसतो, श्रीमंत नसतो, गरीब नसतो, तो असतो फक्त वारकरी. तो पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं निघालेला असतो. म्हणून पंढरपुरचा पांडुरंग हा खर्‍या अर्थानं प्रत्येकाला आपला वाटतो. सात, आठलाख लोक एकत्र येऊन श्रद्धेनं, भक्तीनं, एखाद्या देवासाठी जात आहेत. अशी ही जगाच्या पाठीवर एकमेव घटना असावी.

दिनांक 11-07-2015 22:00:44 Read more

माझे मायबाप वारकरी

santaji maharaj palkhi Warkari Ratnaparkh

श्री. अरविंद रामचंद्र रत्नपारखी (गुरूजी) कोथरूड पुणे.

तुझ्या वडिलो वडीली निर्धारी I चालविली पंढरीची वारी II
त्यासी सर्वथा अंतर न करी I तरीच संसारी सुफळपणा II
    प्रत्येक काम वेळच्या वेळी करणारे शिस्तप्रिय असे आमचे वडील श्री. रामचंद्र महादेव रत्नपारखी (तेली गुरुजी).”येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो I हा होईल दान पसावो II येणें वरें ज्ञानदेवो I सुखिया झाला...II” हा त्यांच्या रोजच्या नित्यकर्मातील ज्ञानेश्वरी वाचनानंतरचा पसायदानाचा समारोप अजूनही कानात घुमतो आहे.

दिनांक 11-07-2015 12:28:59 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in