एकनाथाच्या हाती ज्ञानेश्वरी पडण्यापुर्वी तो भागवताच्या एकादशस्कंदावर स्वत: लिहिलेल्या टीकेचे व भावार्थरामायणाचे पुराण सांगत असे. त्याच्या पुराणास येणार्या मंडळीत एक तेली होता. त्याने एक दिवशी ज्ञानेश्वरीची जुनी पोथी एकनाथाकडे आणली आणि म्हणाला. ’महाराज, ही एक पोथी माझ्या घरात फार दिवस पडली आहे, हिचा आपल्यास काही उपयोग झाल्यास पहा. ब्रह्मज्ञानाने ओतप्रोत भरलेला तो ग्रंथ पाहून एकनाथास फारच आनंद झाला. पुसत आलेल्या त्या ग्रंथाचा जीर्णोद्धार करण्याच्या हेतूने एकनाथाने त्याची एक नवीन प्रत तयार केली. पण या नव्या प्रतीतत्याने मनास वाटेल तसा फेरफार केला ! नंतर लवकरच त्याने स्वरचित ग्रंथास फाटा देऊन, ज्ञानेश्वरीचेच पुरण सांगण्यास प्रारंभ केला.
श्री. संत संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा विशेष अंक
82 भवानी पेठ पुणे (तिळवण तेली समाज कार्यालय) येथे. श्री. संत संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळात श्री. मोहन देशमाने लिखीत श्री. संत संताजी महाराज जगनाडे संपुर्ण इतिहासाचे पुस्तकाचे प्रकाशन पालखी सोहळ्यात करण्यात आले.
- मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ, महाराष्ट्र.
वि. ल. भावे. व संत संताजी यांचा संबंध काय ? आशा काही ज्या घटना आहेत हे जेंव्हा आपण अभ्यासू तेंव्हा संत संताजी यांचा संबंध काय ? अभ्यासू तेंव्हा संत संताजी समजण्याचा मार्ग सापडतो १८६० ते ७० दरम्यान संत तुकारामांच्या अंभंगांचे मोडीतून देवनागरी कारण करणे सुरू झाले. परंतु फक्त महिपती आपल्या लेखनात म्हणतात चाकणचा संतु तेली तुकोबासह अभंग लेखन करी परंतू या दरम्यानच्या मंडळींनी संत संताजी हस्ताक्षरातील वह्या मान्य केल्या नाहित. ही वाटचाल अशीच सुरू होती. परंतू वि. ल. भावे यांनी १९२० च्या दरम्यान फक्त संत संताजींच्या अभांगावरून तुकोबा गाथा तयार केली.
घाण्याचा बैल, बैलाची झापड व चिंतन शिबीर भाग (6)
का नुसती सिंहगर्जना, नुसत्याच जेवणावळी नुसताच संताजी उत्सव, वधुवर मेळावे समाज पातळीवरचा नुसताच संघर्ष म्हणजे समाज कार्य हे असे आहे म्हणुन मेटे कार्यक्रमात बोलणारच. दुबळ्यांचा निषेध मराठा व ब्राह्मण जमेस धरत नाहीत.
घाण्याचा बैल, बैलाची झापड व चिंतन शिबीर भाग (5)
अगदी २००३ ला आसा राष्ट्रवादी (मराठावादी) कॉंग्रेसच्या शरद पवारांच्या पायावर डोके ठेवण्यासाठी सुदूंबरे येथे मेळावा घेतला. आणी तारणकर्ते ठरणार म्हणुन मा. छगन भुजबळ यांच्या सह मा. जयदत्त क्षिरसागर यांना वाटले. पण सत्य काय याच वेळी मराठा - कुणबी ही अस्तीवात नसलेली जात निर्माण केली गेली. हे प्रमाण पत्र मिळवण्यासाठी काही लाख लागतात.