Sant Santaji Maharaj Jagnade
मग सर्व एकत्र आले. पालखी सुरूवात करणे जेवढे कष्टाचे होते तेवढेच, नव्हे जास्तच, त्याचे सातत्य टिकविणे अवघड होते. या अवघडपणावर चर्चा झाली. कार्यातले दोष झिडकारून सोहळा निर्दोष करण्यावर विचारविनिमय झाला. प्रत्येक वर्षी पालखीला भरीव स्वरूप येऊ लागले. तेव्हा पालखीसोहळ्याची पहिली कार्यकारीणी तयार केली.
धोंडिबा राऊत व दादा भगत यांचा आनंद गगनात मावत नव्हता. या पांडुरंगाच्या भेटीसाठी किती दिव्य केले. त्या दिव्याचे जे फळ आले ते फळ पाहुन त्यांना जसा आनंद होत होता तसेच पालखीबरोबर आलेले व इतर गोळा झालेले हरिभक्त आनंदी झाले होते.
माऊलीबरोबर जाणार्या लाखो माणसांचा समुद्र. त्यांना पोटभर जेवण देण्याचे काम हे अर्जुनशेठ करीत. हा लैकिक अनेक वर्षांचा. पालखी निघणार ही गोष्ट दादा भगतांच्या करवी समजली होती. पालखी मावळातून आणण्यास त्यांनीच टेम्पो दिला होता. आणि कार्यकर्त्यांना आशीर्वादही. पालखी बरडला येणार हा आनंद त्यांच्या चेहर्यावर मावत नव्हता
![]()
पालखी वाल्ह्याच्या मार्गाला लागली. वाल्हे या ठिकाणचे पवार व इतर समाजबांधव स्वागताला गावाबाहेर उभेच होते. स्वागत व पूजन केले. संध्याकाळी दमलेल्या बांधवांना जेवण दिले. सकाळी गरम पाणी आंघोळीला दिले. चहापाणी झाल्यावर विश्वनाथ सोपान, विष्णु, सुरेश यांनी पालखी शिवराम पवार यांच्या घरी आणली दत्तात्रय तुकाराम पवार इ. मंडळींनी पालखी गाव वेशीपर्यंत नेली या मुक्कामात पुन्हा चार वारकरी आमच्यात आले.
![]()
शेवटच्या टोकाचे हे बोलणे एैकल्यावर बसलेल्या सर्व मंडळींना माझा राग आला. बाजुचे आचारी व कामगार यांनी राऊतांना मारण्यासाठी कोणी उलथणे, कुणी फाट्या, कुणी काठ्या घेतल्या व ही सर्व खवळलेली माणसे राऊतांच्या अंगावर धावून आली. राऊत एक पाऊलही मागे न सरता म्हणाले, ’’महाराज, तुम्ही चोपदाराकरवी निरोप पाठवून मला बोलाविलेत आपणास माझे मत तळमळीने नम्रपणे सांगितले आपण योग्य न्याय न देता सहकार्यांकरवी अतिरेक करीत आहात, हे आपणासारख्या उच्च पदावरील माणासाला शोभत नाही.