श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती ८ डिसेंबर रोजी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी केली जाणार आहे. याबाबत राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे. संताजी महाराज हे संत तुकाराम महाराज यांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक प्रमुख होते. त्यांच्या अभंग गाथेचे लेखनही संताजी महाराज यांनी केलेले आहे. सुदुंबरे ( ता. मावळ ) येथे संताजी महाराज यांचे समाधिस्थळ आहे. येथील क्षेत्रास राज्य सरकारने तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे.
दि.१ जानेवारी २०२१ ते २० डिसेंबर २०२२ हे वर्ष श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी शताब्दी वर्ष म्हणून तिर्थ क्षेत्र, संतुबरे येथे साजरे होत आहे. या निमित्ताने संताजी महाराजाच्या पादुका व गाथा यांची भव्य रथयात्रा महाराष्ट्रभर काढण्याचे नियोजित आहे. या निमित्ताने सर्व समाज बांधवांना महाराजांचे पादुका व गाथा यांचे दर्शन घेता येईल. याची सुरुवात दि. ८/१२/२०२१ रोजी महारांची जयंती दिनांका पासून श्री क्षेत्र संदुबरे येथून सुरुवात होत आहे.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, सातारा जिल्हा अंतर्गत श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, महाराष्ट्र तसेच समस्त सातारा जिल्हा तेली समाज यांचे संयुक्त विद्यमाने आजोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज रथयात्रा स्वागत मेळावा.
तिळवण तेली समाज ट्रस्ट अहमदनगर वतिने संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य शहर स्तरीय चित्रकला स्पर्धा बुधवार दि. ८ डिसेंबर २०२१, सकाळी ठिक ०९.०० ते ११.०० बक्षिसवितरण - स्पर्धा संपलल्यानंतर अर्ध्या तासाने ११.३० वा. त्याच ठिकाणी होईल.
राठोड तेली युवा सेना महाराष्ट्र अंतर्गत वधु-वर मेळावा समिती आयोजित राज्यस्तरीय राठोड तेली वधु - वर पालक परिचय मेळावा-२०२२, राठोड समाज भुषण पुरस्कार व आदर्श माता सन्मान सोहळा रविवार दि. १६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० ते सायं ५ वाजेपर्यंत मेळाव्याचे ठिकाण : सखुबाई गबाजी गवळी गार्डन हॉल जय महाराष्ट्र चौक समोर, भोसरी, पुणे - ३९.