संताजी तेली बहु प्रेमळ | अभंग लिहित बसे जवळ ॥ धन्य त्यांचे भाग्य संबळ।संग सर्व काळ तुकयाचे ॥
महाराष्ट्र ही जशी शुरांची भूमी आहे तशी ही संतांचीही पुण्यभूमी आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ व ज्यांच्या अभंगवाणीने सर्व महाराष्ट्राला भक्तीरसात बुडवून टाकले अशा संत तुकाराम महाराज व त्यांचेच समकालीन सेना न्हावी, नरहरी सोनार, गोरा कुंभार, संत रोहिदास इ. संत होवून गेले.
नाशिकरोड : महावितरणच्या नाशिक परिमंडळ कार्यालयातील विद्युत भवन येथे संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंता रंजना पगारे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले.
संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेद तालुक्यातील मावळ या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठल भक्त होते त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर धार्मिक संस्कार झाले व धार्मिक बाजूकडे त्यांना आवड निर्माण झाली.
संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठलभक्त होते, त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. तेल्याचे घर असल्यामुळे मुलांला हिशोब करता येणे गरजेचेच असते त्यामुळे संताजी महाराजांना देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते.
श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्ताने श्री क्षेत्र सुदुंबरे येथील संत संताजी जगनाडे महाराज समाधीस अभिषेक आणि महापूजा, सुदुंबरे संस्थानचे अध्यक्ष शिवदास उबाळे, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली. यावेळी यावर्षीचा पुण्यतिथी उत्सवाचे अध्यक्ष जयंत राऊत आणि उद्घाटक सिद्धेश रत्नपारखी उपस्थित होते.